शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

भूसंपादनाची अधिसूचना जाहीर

By admin | Updated: December 10, 2015 00:48 IST

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण : प्रांताधिकाऱ्यांनी दिली माहिती

कुडाळ : राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवाच्या चौपदरीकरणात येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील १८ गावांमधील भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाली आहे. या चौपदरीकरणात येणाऱ्या मंदिरांबाबत तेथील जनतेशी चर्चा करून मंदिर दुसरीकडे बांधण्याबाबत शासन व संबंधित एजन्सी मदत करेल, चौपदरीकरणाच्याबाबत हरकती घेता येथील चौपदरीकरणाबाबत कोणालाही न्यायालयात जाता येणार नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत कुडाळ प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी दिलीमहामार्गाच्या चौपदरीकरणाची भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाली असून या संदर्भात रवींद्र्र बोंबले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कुडाळ तालुक्यातील १८ गावांमधील चौपदरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची मोजणी संबंधित राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग व महसूल प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन कायदा (१९५६) नुसार पूर्ण केली असून याबाबतचा तसा प्रस्ताव ही केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. आता कुडाळ तालुक्यात कसाल ते झाराप पर्यंत सुमारे ३१ किमीच्या महामार्गाचे सद्यस्थितीत चौपदरीकरण होणार असून याबाबतची भूसंपादन प्रक्रियेसाठी प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आतमध्ये ज्यांना हरकती घ्यायच्या आहेत त्यांना हरकती घेता येतील. हरकती घेतल्यानंतर ज्या विभागाचा तो प्रश्न असेल त्या विभागाकडे तो सोडविण्यासाठी पाठविण्यात येणार व त्यानंतर पुन्हा या भूसंपादनाच्या बाबतीत हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येणार आहे, अशीही त्यांनी माहिती दिली. कुडाळ तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, वनक्षेत्रपाल कडावल, वनक्षेत्रपाल मंडळ कृषी अधिकारी कुडाळ, कृषी पर्यवेक्षक कुडाळ, कृषी पर्यवेक्षक कडावल, कृषी पर्यवेक्षक माणगांव, वनविभाग, उपअभियंता वीज कंपनी कुडाळ, उपविभागीय अभियंता आदी विभागाचे अधिकारी महामार्गाच्या चौपदरीकरणात किती जनतेची घरे, झाडे, शेती बागायती, जंगलाचा काही भाग, दुकाने येतात त्याची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी व मोजणीचे काम पूर्ण करताहेत. त्या संबंधित अहवाल लवकरच प्राप्त होईल व येत्या काही दिवसात भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल असेही रवींद्र बोंबले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रवींद्र बोंबले : आकारीपड जमीन सर्वेक्षण सुरू कुडाळ तालुक्यातील आकारीपड जमिनींचे सर्वेेक्षण सुरू आहे. लवकरच तेथे स्थळपाणी जबाब घेऊन नोटीस बजावल्या जाणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना जमीन वहीवाटाबाबतचे ४0 वर्षापूर्वीचे पुरावे शासनाला सादर करावे लागणार आहेत. तसेच ज्यांच्या नावे जमिनी होणार व अशांनी अजूनही जमिनीचे बाजारमूल्य एक वर्षाच्या मुदतीत भरले गेले नाही तर अशांच्या जमिनीबाबत प्रशासन पुन्हा वेगळी भूमिका घेणार आहे, असेही रवींद्र बोंबले म्हणाले. यावेळी बोलताना बोंबले म्हणाले की, महामार्गाच्या चौपदरी करणात येणाऱ्या काही मंदिरांना काढावे लागणार असून या ठिकाणच्या मंदिरांबाबत तेथील जनतेशी चर्चा करून संबंधित मंदिर दुसरीकडे जमीन दिल्यास ते मंदिर बांधण्याबाबत शासन व संबंधित एजन्सी मदत करेल, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय महामार्गाचे असे होणार भूसंपादनकुडाळ तालुक्यातील ३१ किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदरीकरणात सुमारे ७९ हेक्टर क्षेत्र जमीन जाणार असून ही जमीन सुमारे १५ हजार खातेदारांची आहे. भूसंपादन हे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन कायद्यानुसार होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग कायदा (१९५६) नुसार महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कोणत्याही कामाच्या विरोधात कोणालाही न्यायालयात जाता येणार नाही.ज्या ठिकाणी सातबारावर शासनाचे नाव नाही आहे त्याठिकाणी कमी जास्त बदल करून महामार्गासाठी लागणारी जमीन शासनाच्या नावावर करण्यात येणार आहे.ज्यांची जमीन, घरे, बागायती, शेती, झाडे व इतर साधनसंपत्ती महामार्गाच्या चौपदरीकरणात गेली आहे त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन कायद्यानुसार किमान साडेतीन पट मोबदला निश्चितच मिळणार आहे.तालुक्यातील वाडीहुमरमळा, पणदूर, पावशी बोरभाट, बेलनदी, बांबार्डे तर्फ कळसुली, कसाल, रानबांबुळी,ओरोस बुद्रुक, कुडाळ, सांगिर्डे, गुढिपूर, पिंगुळी, टेंबधुरीनगर,बिबवणे, बांबार्डे तर्फ माणगांव, जांभरमाळा, झाराप ही १८ गावे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात येणार आहेत.