शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: जनावरांनी खाल्ली सव्वाचार लाखांची रक्तचंदनाची रोपे, मालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:54 IST

सीसीटीव्हीमुळे जनावरांचा शोध

मंडणगड : राेपवाटिकेतील रक्तचंदनाची तब्बल ४,३४८ राेपे जनावरांनी खाऊन ४ लाख ३४ हजार ८०० रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार मंडणगड तालुक्यातील वाकवली येथे घडली. याप्रकरणी मंडणगड पाेलिस ठाण्यात जनावरांच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजू ढेबे (रा. धनगरवाडी चिंभाचे, ता. महाड, जि. रायगड) असे जनावरांच्या मालकाचे नाव आहे. याप्रकरणी काेकण वैभव निसर्ग कंपनी प्रकल्पाचे व्यवस्थापक अनिल सावंत (वय ५१, मूळ रा. गाेळपवाडी, निगडी, ता. कऱ्हाड, सातारा, सध्या रा. शेनाळे-साेवेली, मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार १२ मे २०२५ राेजी दुपारी घडली आहे. 

तालुक्यातील वाकवली परिसरात व्ही.बी.पी. कंपनी यांच्यावतीने कोकण वैभव निसर्ग हा प्रकल्प राबविला जात आहे. त्याकरिता रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेत मोहगणी, रक्तचंदन, आगरवूड यासारख्या व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्न देणाऱ्या प्रजातींची रोपे आयात करून मागील चार वर्षांपासून या नर्सरी ती वाढविली जात आहेत. मात्र, दिनांक १२ मे रोजी सहा ते सात मोकाट जनावरांनी या रोपवाटिकेमध्ये घुसून नाव रोपे खाल्ली आहेत.

यासंदर्भात दिनांक १२ मे रोजी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. तसेच ग्रामस्थांकडे जनावरांबाबत चाैकशीही करण्यात आली. त्या माहितीनुसार मंडणगड पोलिस ठाण्यात रक्तचंदन या प्रजातीच्या रोपांचे नुकसान केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार २२ जूनला भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२४ (५) प्रमाणे राजू ढेबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार गणेश चव्हाण करीत आहेत.

सीसीटीव्हीमुळे जनावरांचा शोधरोपवाटिकेमध्ये देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यांमध्ये राेपवाटिकेतील ही राेपे जनावरे खाताना दिसत आहेत. तसेच या राेपांची नासधूस केल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडे या जनावरांबाबत चौकशी केली असता ही जनावरे महाड येथील राजू ढेबे यांची असल्याची माहिती मिळाली.