शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

नाराज कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर येणार

By admin | Updated: April 7, 2015 01:28 IST

माधव गवळी : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट

चिपळूण : तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दि. २२ रोजी होत असून, माधव गवळी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप स्वबळावर लढणार आहे. गवळी यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून, चिपळूणमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमधील नाराज कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये यावे, त्यांचे भाजपामध्ये स्वागतच होणार आहे, असे मत माधव गवळी यांनी व्यक्त केले आहे. गवळी या भाजपच्या युवा नेतृत्त्वाने चिपळूण - संगमेश्वर मतदार संघामध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावागावातील कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत आहेत. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरविली जात आहे. आजपर्यंत तालुक्यात भाजपच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत नाही. मात्र, यावेळी काही ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकवणार, असा विश्वास गवळी यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने गावातील कार्यकर्ते गवळी यांच्याबरोबर गाठीभेटीचे आयोजन करीत आहेत, त्यांचे मार्गदर्शन घेत असून, गावाचा विकास झटपट होण्यासाठी भाजपलाच विजय करायला हवे, असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावपातळीवरील राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले असून, विशिष्ठ परिस्थितीमुळे युतीतील दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने उभे राहणार आहेत. त्यामुळे नाराज उमेदवार भाजपाच्या वाटेवर आहेत. आदर्श गाव या संकल्पनेसाठी वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमधील कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. भाजपने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण विकासावर भर दिला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत ब्रॉडबॅ्रडने जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमधील कारभार दिल्लीमध्ये दिसणार आहे. यापुढे ग्रामपंचायतीसाठी निधी परस्पर त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येक गावाचा विकास हाच ध्यास भाजपने घेतला आहे, याचा फायदा प्रत्येक ग्रामपंचायतीने घ्यायला हवा, असे गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)1चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याने या निवडणुकीत प्रथमच पक्षाचे अस्तित्व पणाला लागणार आहे.2ग्रामपंचायत निवडणुकीत गावपातळीवरील राजकारणात पक्षाचा संबंध येत नसून, त्याबाबत यंदा उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप वर्चस्व राखणार काय, याकडे लक्ष आहे.चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाच्या घडामोडी.गावातील विविध विकासकामांवर लक्ष देण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना. विकासाचा ध्यास प्रत्येक ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे, त्यासाठी प्रयत्न हवेत.युतीचे उमेदवार येणार आमने- सामने असल्याने उत्सुकता.