शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांकडे ३ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 13:20 IST

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांची वीजबिले वेळेत न भरल्यामुळे कोट्यवधीची रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांची वीजबिले वेळेत न भरल्यामुळे कोट्यवधीची रुपयांची थकबाकी आहे. ७ हजार ३६ शासकीय कार्यालयांनी वीजबिले न भरल्यामुळे ३ कोटी १९ लाख ४१ हजार रूपयांची थकबाकी राहिली आहे. थकबाकी वसुलीच्या सूचना महावितरणने दिली असून, थकबाकी न भरणाºयांचा वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्याचा आदेश दिला आहे.

शासकीय कार्यालयांकडून वीजबिले थकल्यामुळेच थकबाकीची रक्कम वाढली आहे. जिल्ह्यातील वित्त विभागाच्या जिल्हा कार्यालयाकडे १० हजार, अन्न प्रशासनाच्या १० कार्यालयाकडे ३७ हजार, सामान्य प्रशासनाच्या १३ कार्यालयांकडे १४ हजार, ग्रामपंचायतींच्या ३ हजार २०२ कार्यालयांकडे २ कोटी ५१ लाख १८ हजार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या २ कार्यालयांकडे २ हजार, गृह विभागाच्या ९७ कार्यालयांकडे ४ लाख २८ हजार, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या २ कार्यालयांकडे १९ हजार  रूपये थकीत आहेत.

कृषी विभागाच्या १८ कार्यालयांकडे २२ हजार, ‘ब’ वर्गच्या ५६ नगरपालिकेकडे ४९ हजार, ‘क’ वर्गाच्या ९३ नगरपालिकांकडे ३ लाख ४३ हजार, केंद्र शासनाच्या २२ कार्यालयांची ८३ हजार, सहकार व वस्त्र उद्योगच्या ४ कार्यालयांकडे ५७ हजार, पर्यावरण विभागाच्या ४ कार्यालयांकडे १४ हजार रूपये थकबाकी शिल्लक आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १८८० कार्यालयांकडे २१ लाख ४८ हजार, शिक्षण विभागाच्या ९७ कार्यालयांकडे १ लाख २१ हजार, राज्य शासनाच्या ६७२ कार्यालयांकडे ७ लाख ४३ हजार, जिल्हा परिषदेच्या ८१ कार्यालयांकडे १ लाख १० हजार, रेल्वेच्या २१ कार्यालयांकडे १२ हजार, समाजकल्याणच्या १६ कार्यालयांकडे ७ हजार रूपये थकीत आहेत. 

स्थानिक प्राधिकरणाच्या २४१ कार्यालयांकडे १० लाख २० हजार, औद्योगिक विकास महामंडळाच्या ८ कार्यालयांकडे ५१ हजार, नगरपालिका प्रशासनाच्या ९५ कार्यालयांची २ लाख १० हजार, नियोजन विभागाच्या ५४ कार्यालयांकडे ६१ हजार, महसूल व वन विभागाच्या  २६ कार्यालयांकडे २ लाख ३१ हजार रूपये थकीत आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ७ कार्यालयांकडे २५ हजार, पर्यावरण विभागाच्या ८ कार्यालयांकडे ५१ हजार, कृषी विभागाच्या १८ कार्यालयांकडे २२ हजार रूपये थकीत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ४४ कार्यालयांकडे एक लाख १५ हजार, सार्वजनिक विभाग केंद्र शासनाच्या ४ कार्यालयांकडे १० हजार , सार्वजनिक विभाग राज्य शासनाच्या २४ कार्यालयांकडे २ लाख ४३ हजार, पाटबंधारे विभागाच्या ४ कार्यालयांकडे ४ हजार, औद्योगिक प्रक्रिया विभागाच्या ६१ कार्यालयांकडे २ लाख ८८ हजार रूपयांची थकबाकी आहे.

...तर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईथकबाकी वसुलीसाठी महावितरणचे सर्व कर्मचारी ते अधिकारीवर्गापर्यंत सूचना करण्यात आल्या आहेत. थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन तर करण्यात आले आहे. मात्र, थकबाकी न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या सूचनांची अंमलबजाणी न करणारे कर्मचारी आणि अधिकारीवर्गावरही कारवाई करण्यात येणार आहे.- पी. जी. पेठकर, प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल