रत्नागिरी : काेकणात माेठ्या उत्साहात साजऱ्या हाेणाऱ्या गणेशाेत्सवाची महती सातासमुद्रापार पाेहाेचली आहे. परदेशातही गणेशाेत्सव साजरा हाेत असतानाच रत्नागिरीत आलेल्या अमेरिकन पाहुण्यांनाही या उत्सवाची भुरळ पडली. या पाहुण्यांनी शहरातील मांडवी किनारी विसर्जन मिरवणुकीत सहभागी हाेत वाद्य वाजविण्याचा आनंद लुटला.टायलर आणि जाे हे दाेन अमेरिकन पाहुणे गुरूवारी रत्नागिरी शहरात आले हाेते. त्यानंतर रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील श्री रत्नागिरीच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर हे पाहुणे मांडवी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. विसर्जन मिरवणुकीत सहभागी हाेत त्यांनी गणेशमूर्ती उचलून विसर्जनस्थळी नेल्या. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत ढाेल-ताशा वाजविण्याचा आनंदही लुटला. या दाेघांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत हाेता.
अमेरिकन पाहुण्यांना गणेश उत्सवाची भुरळ, रत्नागिरीत विसर्जन मिरवणुकीत लुटला वाद्य वाजविण्याचा आनंद
By अरुण आडिवरेकर | Updated: September 29, 2023 16:50 IST