शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कशेडी घाटाला पर्यायी विन्हेरे मार्गही खडतरच

By admin | Updated: June 30, 2017 16:06 IST

मार्गाची सध्या दुर्दशा : वाहतुकीलाच धोकादायक

आॅनलाईन लोकमतखेड (जि. रत्नागिरी) , दि. ३0 : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या तुळशी-विन्हेरे मार्गाची सध्या दुर्दशा झाली आहे़ महामार्गावर आवश्यक हलक्या व अवजड वाहनांच्या रहदारीसाठी आवश्यक सुविधादेखील या मार्गावर उपलब्ध नसल्याने हा पर्यायी मार्ग असून नसल्यासारखाच आहे.नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तुळशी-विन्हेरे रस्त्याची करोडो रूपये खर्चून मजबुती करण्यात आली होती. मात्र, हे काम निकृष्ट झाले असून, त्यामुळे या मार्गाची पुरती वाट लागली आहे. तसेच अद्यापही या मार्गावरील ४ किलोमीटर रस्ता नादुरूस्त असल्याने हा मार्ग वाहतुकीलाच धोकादायक बनला आहे. आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून वापरात आलेल्या या मार्गासाठी राज्य सरकारने निधी दिला होता. मात्र, या निधीच्या खर्चाबाबतच संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. हा रस्ता पुरता उखडल्याने पावसाळ्यात हा मार्गच बंद होणार असल्याच्या शक्यतेने वाहनचालक धास्तावले आहेत़ या मार्गाची नव्याने पाहणी करून मार्गाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तुळशी-विन्हेरे हा मार्ग सर्वपरिचीत आहे. मात्र, सध्या या मार्गाची पुरती चाळण झाली असून, हा मार्गच आता ‘डेंजर झोन’मध्ये आला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थामुळे सध्या या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झालेली पाहायला मिळत आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.कशेडी हा घाट रत्नागिरी व रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहे़ दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे हा घाट स्वागतच करीत असतो. मात्र, हाच कशेडी घाट गेल्या काही वर्षात शापीत झाला आहे. दरडी कोसळणे, लहान-मोठ्या अपघातांत अनेकांचे बळी जाणे आणि वाहनांचे नुकसान होणे अशा गंभीर घटना घडल्या आहेत. घाटातील एकूणच नागमोडी वळणे आणि चढ-उतारांमध्ये समतोल नसल्यामुळेदेखील या अपघातांना आमंत्रण मिळत आहे.