दापाेली : तालुक्यातील जालगाव येथील बहुविकलांग दिव्यांग (गतिमंद) मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. शिक्षकांसह, पालकांनी ‘गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा’ या गाण्यावर ठेका धरला आणि मुलांचा आनंद द्विगुणित केला. मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते.
यावेळी अन्वय लांजेकर व साहिल चव्हाण या दोघांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली हाेती. यावेळी दापोली लायन्स क्लबचे अध्यक्ष चेतन जैन, सचिव नीलेश हेदुकर, खजिनदार केतन वणकर, सदस्य महेंद्र जैन, प्रसाद मेहता, मंदार केळकर, आशिष अमृते, हेमाली जैन, राजीव करंदीकर यांनी जन्माष्टमी कार्यक्रमात सहभाग घेऊन मुलांच्या आनंदात भर घातली. मुलांना खेळाच्या साहित्याचे वाटप केले. त्याचबरोबर स्वरांगी करंदीकर हिने गाणे सादर केले. यावेळी संस्थेचे प्रमुख हसमुख जैन, शुभांगी गांधी, रेखा बागुल, महेश्वरी विचारे, शीतल देवरुखकर यांच्यासह शिक्षक किरण घोरपडे, प्रा. संदेश चव्हाण, गणेश मोहिते, उपस्थित होते. यावेळी पद्मनाभ केळकर याने स्वागत गीत सादर केले. तसेच पद्मनाभ केळकर व अथर्व सावंत या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिली हंडी फोडल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे सांगितले.