शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षाची ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी

By शोभना कांबळे | Updated: December 19, 2023 18:17 IST

विशाखापट्टणम येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत २७ राज्य व १० कंपन्यांच्या खेळाडूंचा सहभाग 

रत्नागिरी : आंध्र प्रदेश राज्य कॅरम असोसिएशन यांच्या विद्यमाने गितम केआरएम इंदोर स्टेडियम विशाखापट्टणम येथे झालेल्या ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेत देवडे (ता. संगमेश्वर) गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा उदय कदम हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.आंध्र प्रदेश राज्य कॅरम असोसिएशन यांच्या विद्यमाने गितम केआरएम इंदोर स्टेडियम विशाखापट्टणम येथे २८ व्या ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम ही इंडियन ऑईल व ओएनजीसी कंपनीच्या संघातून सहभागी झाली होती. या स्पर्धेत आकांक्षाने उत्तुंग अशी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत २७ राज्य व १० कंपन्यांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १८ वर्षीय आकांक्षाने चमकदार कामगिरी करत सर्वांची मने जिंकली आहेत.आकांक्षाने आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयेशा खान, एस अपूर्वा, रश्मीकुमारी यांना पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू एस. अपूर्वा बरोबर खेळताना तिने ब्रेक टू फिनिशची नोंद केली; परंतु सेमीफायनलला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू नागाज्योतीकडून आकांक्षाला थोडक्यात हार पत्करावी लागली.आकांक्षाने राज्य पातळीवर तीन वेळा ज्युनिअरचे तर आठवेळा खुल्या गटाचे विजेतेपदक पटकावले आहे. तर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ज्युनिअर गटात आकांक्षाने एक वेळेस विजेतेपद तर एक ब्रांझ पदक मिळविले आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक व दोन ब्रांझपदके मिळविली आहेत. जिल्हास्तरीय, विभागीय स्पर्धेतही आकांक्षाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे.वयाच्या १७ व्या वर्षी आकांक्षाने पश्चिम बंगाल दुर्गापूर येथे झालेल्या इन्स्टिट्यूटच्या नॅशनल कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून विजेतेपद पटकावले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी