शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाला सरकारचे आर्थिक पाठबळ गरजेचे : निरंजन डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:14 IST

कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाला सरकारचे आर्थिक पाठबळ गरजेचे : निरंजन डावखरेसमन्वयक म्हणून डावखरे यांची दापोली कोकण कृषी विद्यापीठाला भेट

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु नसल्याने प्रशासकीय कामात काही अडथळे निर्माण होऊन, गतिमान प्रशासनाला थोडा ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. परंतु, कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी समन्वयक या नात्याने प्रयत्न केले जाईल.

कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेवर निरंजन डावखरे यांची निवड झाली आहे. कृषी विद्यापीठाचे समन्वयक म्हणून त्यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यावर लवकरच उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीदरम्याने त्यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन करीत आहेत आपण आजपर्यंत आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात एवढेच संशोधन विद्यापीठाचे असल्याचे बोलले जात होते. मात्र विद्यापीठाने याही पुढे जाऊन कोकणच्या लाल मातीत उत्कृष्ट स्टॉबेरी भाजीपाला विविध फळ पिकाचे संशोधन केले आहे. विद्यापीठाचे हे संशोधन कौतुकास्पद आहे. विद्यापीठाचे कामाला सरकारची जोड मिळावी यासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.कोकण कृषि विद्यापीठाला सरकारची सर्वतोपरी मद्त मिळावी कोकणातील शेतकºयांचा व कृषि क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, संशोधन, विस्तार या विविध उपक्रमाचा आढावा घेतला असता, काही बाबींना सरकारकडून आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.कोकण कृषि विद्यापीठाचे संशोधन आता केवळ कोकणापुरते मर्यादित राहु नये, त्याची व्याप्ती देश पातळीवर असायला हवी. कोकणातील भात, मासे, नारळ, सुपारी, आंबा, काजू या पुढे जावून संशोधन होने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.सरकाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील कृषि विद्यापीठे शिक्षण, संशोधन, विस्तार, या विविध स्तरावर काम सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी कृषि विद्यपिठाचे संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान फार महत्वाचे आहे.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेRatnagiriरत्नागिरी