शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या कामगारांचे दिल्लीत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:04 IST

दापोली कोकण कृषी विद्यापीठातील २८६ रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर  राष्ट्रव्यापी उपोषण सुरू केले आहे. अँटी करप्शन कमिटी एलियस भ्रष्टाचार निर्मुलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाच्या कामगारांचे दिल्लीत उपोषणकृषी विद्यापीठातील २८६ रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी आंदोलन

दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठातील २८६ रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर  राष्ट्रव्यापी उपोषण सुरू केले आहे. अँटी करप्शन कमिटी एलियस भ्रष्टाचार निर्मुलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.कोकण कृषी विद्यापीठातील कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी गेली अनेक वर्षे सुरू आहे. या कामगारांनी यापूर्वी वेळोवेळी उपोषण व आंदोलनसुद्धा केले होते. मात्र, त्यांना केवळ आश्वासने दिली जात होती. अखेर सर्व कामगारांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून हे उपोषण सुरू करण्यात आले.दापोलीतील कामगारांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. भ्रष्टाचार निर्मुलन समिती राज्य अध्यक्ष यलप्पा पोवार, कोकण विभाग अध्यक्ष तानाजी पोवार, कामगार अध्यक्ष दत्तात्रय भुवड, नंदकिशोर कोठावडे, सुनील भुवड यांच्यासह मजूर, भ्रष्टाचार निर्मुलनचे कार्यकर्ते दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्ते कामगार पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कृषिमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीRatnagiriरत्नागिरीdelhiदिल्ली