शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

अतिरिक्त शिक्षक प्रश्न मार्गी

By admin | Updated: December 9, 2014 23:18 IST

संचमान्यतेला अनुकूल : शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर रामनाथ मोते यांनी उपोषण सोडले

वाटूळ : २०१३-१४च्या संचमान्यतेत बदल करुन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवू नये. शिक्षणसेवकांना सेवा संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष, आमदार ना. गो. गाणार व कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरु केले.या विषयासंदर्भात राज्याच्या शिक्षण सचिव अश्विनी भिडे, शिक्षण आयुक्त चोकलिंगम तसेच राज्यातील सर्व शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांची बैठक आयोजित करुन आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे लेखी पत्र दिल्यानंतर आमदारांनी उपोषण मागे घेतले. शिक्षक परिषदेच्या आमदारांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले असून, आजच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री कोणता निर्णय घेतात, यावर शिक्षक परिषदेच्या पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरणार असल्याचे रत्नागिरी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले. या प्रश्नावर मोते यांनी गेले काही काळ आंदोलन छेडले होते. यंदा मोते यांना या प्रश्नावर स्वसरकारविरोधातच दंड थोपटावे लागले आहेत. (वार्ताहर)शिक्षणसेवक, संचमान्यतेवर चर्चाशिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणसेवक यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भात आमदार रामनाथ मोते यांनी नागपूर विधानभवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रश्नाबाबत आपण राज्याच्या शिक्षण संचालकांशी बोलून यावर तोडगा काढू, असे लेखी आश्वासन यावेळी आमदारांना दिल्यानंतर त्यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला.हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते व ना. गो. गाणार बसले आमरण उपोषणाला.शिक्षणसेवकांच्या सेवेला संरक्षण.संचमान्यतेबाबत सकारात्मक निर्णय.शिक्षणसेवकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर निर्णय दृष्टीपथात. तावडे यांनी दिले शिक्षक आमदारांना आश्वासन.