शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर नौकांवर कारवाई केवळ दिखाव्यापुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 14:38 IST

illegal boats, ratnagiri news, fishrman अवैध मासेमारी करणाऱ्या पर्ससीन व मिनी पर्ससीन नौका मालकांकडून मिळणारा हप्ता बंद होईल म्हणून थातूरमातूर कारवाई करण्यात येत आहे़,

ठळक मुद्देबेकायदेशीर नौकांवर कारवाई केवळ दिखाव्यापुरतीअधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी

रत्नागिरी : अवैध मासेमारी करणाऱ्या पर्ससीन व मिनी पर्ससीन नौका मालकांकडून मिळणारा हप्ता बंद होईल म्हणून थातूरमातूर कारवाई करण्यात येत आहे़, असा गंभीर आरोप आयुक्तांना निवेदनामध्ये करण्यात आला आहे़.

या नौका तत्काळ जप्त करुन अवैध मासेमारीला चालना देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने महाराष्ट्र राज्याचे आयुक्त मत्स्य व्यवसाय अतुल पटणे यांच्याकडे केली आहे़रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या कार्यक्षेत्रात राजिवडा, मिरकरवाडा, मिऱ्या, साखरतर, वरवडे, जयगड, दाभोळ, साखरीनाटे बंदरात गेली अनेक वर्षे अवैध मिनी पर्ससीन मासोरी केली जात आहे़.

सुमारे ७०० पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नौका ट्रॉलिंग, गीलनेट मासेमारी परवाने घेऊन मासेमारी करीत आहेत. तसेच काही नौका मासेमारी परवाने न घेता अवैध पर्ससीन मासेमारी करत आहेत, असे निवेदनामध्ये म्हटले आहे़.दिनांक २८ सप्टेंबर रोजी मिरकरवाडा जेटी येथे दोन नौकांवर केवळ ३१ हजार रुपये रकमेची थातूरमातूर दंडात्मक कारवाई करुन त्यांना पुन्हा अवैध पर्ससीन मासेमारी करण्यास मोकळे सोडून दिले आहे़ आजघडीस त्या नौकांसह अन्य शेकडो पर्ससीन, मिनी पर्ससीन नौका मासेमारी करीत आहेत. परंंतु मत्स्य खात्याचे अधिकारी केवळ स्वार्थापोटी जाणीवपूर्वक अवैध मासेमारीला आळा घालत नसल्याचे म्हटले आहे.अवैध मासेमारी सुरूच५ फेबु्रवारी २०१५ रोजी पासून पर्ससीन मासेमारीवर कायद्याने अनेक निर्बंध घातले असले तरी देखील रत्नागिरी जिल्ह्यात कायदे मोडून अवैध मासेमारी सुरू आहे. पर्ससीन, मिनी पर्ससीन, एल़ई़ डी़ लाईटने पर्ससीन मासेमारी पूर्ण हंगाम सुरु आहे, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे़

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी