शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Ratnagiri : निवळीतील हॉटेल वृंदावनवर जिल्हा प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 16:09 IST

CoronaVirus In Ratnagiri : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळानंतरही हॉटेल सुरू ठेऊन, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.

ठळक मुद्देनिवळीतील हॉटेल वृंदावनवर जिल्हा प्रशासनाची कारवाईनियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद

रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळानंतरही हॉटेल सुरू ठेऊन, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टांरंट यांना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करुन फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे. तसेच हॉटेलच्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही. त्याचप्रमाणे सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे.याअनुषंगाने दि. २५ मे रोजी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अचानक रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील हॉटेल वृंदावन ला भेट दिली. त्यावेळी हे हॉटेल सुरु असल्याचे व एका आराम बसमधील प्रवासी हे टेबल सर्व्हीस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दीही दिसली.त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रत्नागिरीचे तहसीलदार, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत या हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये हॉटेलमध्ये टेबल सर्व्हीस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लघंन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तत्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यंत सीलबंद केले. तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल आस्थापनावर १३ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी