खेड : तालुुक्यातील शिरवली धरणावरील साखळी क्ऱ ४०मधील जुन्या विहिरीचे मोकळ्या जागेत ठेवलेले ५०० किलो किमतीचे लोखंडी साहित्य चोरून ते टेम्पोमध्ये भरताना खेड पोलिसांनी तिघा चोरट्यांना रंगेहात पकडले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर २ वाजूून ५ मिनिटांनी घडली. या साहित्याची किंमत १२ हजार ५०० रूपये आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांना अटक करण्यात आली. आरोपी संतोष रामचंद्र टेमकर (लवेल), पद्माकर पांडुरंग दवंडे (परशुुराम-दुर्गेवाडी), रमेश रामचंद्र मोरे (खेर्डी, शिगवणवाडी - चिपळूण) या तिघांनी शिरवली धरणावरील सरकारी मालकीच्या जुन्या विहिरीचे लोखंडी साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी महिंद्रा मॅक्स पिकअपचा (एमएच ४८ जी २६९७) वापर केला होता. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या अंगाशी आला़ याप्रकरणी करटेल आणि शिरवली येथील काही तरूणांची भूूमिका महत्त्वपूर्ण होती़ त्यांनी खेड पोलिसांना कळविल्यानंतर रात्रीची गस्त घालणार्या पोलिसांनी कर्टेलमार्गे येऊन या तिघा चोरट्यांना लोखंडी साहित्य चोरून टेम्पोमध्ये भरताना अलगद पकडले़ याअगोदरही येथील काही साहित्याची चोरी होेत होती़ आता या आरोपींच्या अटकेमुळे बहुतांश चार्यांप्रकरणी माहिती मिळणे शक्य होणार असल्याचा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीप्रकरणी शिरवली येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे अभियंता हेमंत विनायक ढवण (२६, काविळतळी, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
धरणावरील साहित्य चोरताना आरोपी अटकेत
By admin | Updated: May 14, 2014 00:25 IST