शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

शालेय पोषण अधिक्षक संतोष कठाळे यांच्याकडून गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:06 IST

लांजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहारा अधिक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी सुमारे ११,२१,३२७ रुपयांची अनियमितता केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल कठाळे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. लाखो रुपयांचा नियमबाह्य पध्दतीने वापर करण्यात आल्याचे चौकशीमध्ये उघड झाले आहे.

ठळक मुद्दे अधिकाराचा गैरवापर करुन सेल्फ चेक काढलेतब्बल ११ लाखांची अनियमितता

रत्नागिरी : लांजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहारा अधिक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी सुमारे ११,२१,३२७ रुपयांची अनियमितता केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल कठाळे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. लाखो रुपयांचा नियमबाह्य पध्दतीने वापर करण्यात आल्याचे चौकशीमध्ये उघड झाले आहे.संतोष कठाळे हे सध्या रत्नागिरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहार अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. कठाळे यांच्या कार्यपध्दतीबद्दल रत्नागिरी पंचायत समितीच्या सभाही गाजल्या आहेत. कठाळे यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव, रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला होता.लांजा पंचायत समितीत शालेय पोषण आहार अधिक्षक तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदावर कार्यरत असताना कठाळे यांनी ११ लाख २१ हजार ३२७ रुपयांचा सेल्फ चेक काढून कोणतेही अधिकार नसताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे पुढे आले आहे. धान्य कोठा/ भांडी खरेदीसाठी वित्त विभागाकडून २४८ शाळांना २,३९,३२० रुपये अनुदान वितरीत करणेसाठी देण्यात आले होते. हे अनुदान शाळांना वितरीत करण्याऐवजी शालेय पोषण आहाराच्या खात्यावर नियमबाह्यरित्या वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.लाजा तालुक्यातील ५५ शाळांच्या देयकांची ३,९३,२५० रुपये एवढी रक्कम शाळांना वाटप करण्याऐवजी अन्य खात्यात जमा करुन अनियमितता केल्याचे आढळूुन आले आहे. तसेच २,७०,१२६ रुपये एवढी रक्कम नियमबाह्य खात्यावर वर्ग करुन त्या रक्कमेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न करता ४ लाख ६९ हजार ६५० रुपये कठाळे यांनी ही रक्कम सेल्फ चेकने काढली. त्यानंतर या रक्कमेतून १ लाख १९ हजार रुपयांची अनुदान नसतानाही स्टेशनरी खरेदी केली. मात्र, ही स्टेशनरी खरेदीनंतर प्राप्त झाल्यावर त्याची नोंद साठा रजिस्टरलाही घेण्यात आलेली नसल्याने चौकशीमध्ये दिसून आले आहे.

शिक्षण विभागाचे कोणतेही आदेश नसताना ठसाळे यांनी शिक्षकांची प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रबाबत कार्यशाळा घेण्यासाठी ५० हजार रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम अनुदान नसतानाही खर्च केल्याने हा खर्च संशयास्पद असल्याचे चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.अशा प्रकारे लाखो रुपयांचा खर्चामध्ये अनियमितता आढळून आल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. कठाळे यांनी आर्थिक अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी कठाळे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.कठाळेंच्या जिल्हा बदलीचे आदेशरत्नागिरी पंचायत समितमध्ये शालेय पोषण आहार अधिक्षक कठाळे यांचे प्रकरण गाजत असतानाच त्यांनी लांजा तालुक्यात कार्यरत असताना आर्थिक कामकाज करताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे चौकशीमध्ये पुढे आले आहे. त्यातच कठाळे यांची अन्य जिल्ह्यामध्ये बदलीचे आदेश रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना सोडणार कि त्यांच्यावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी