शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

स्मार्टफोनवर केलं लघुपटाचे चित्रीकरण, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला कोकणातील शेतकऱ्याचा मुलगा

By शोभना कांबळे | Updated: July 28, 2022 12:19 IST

कोणत्याही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये न जाता, आपल्या अनुभव आणि जिद्दीच्या जोरावर हा लघुपट तयार केला आणि त्याच जोरावर संपूर्ण पोस्ट प्रॉडक्शन, पोस्टर डिझाइन अशी जबाबदारीही लीलया पेलली.

शोभना कांबळेरत्नागिरी : तालुक्यातील उक्षी गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सुधीर घाणेकर या धडपड्या तरुणाचा ‘ऑस्करची गोष्ट’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीत झळकला आहे. केवळ स्मार्टफोनवर करण्यात आलेले या लघुपटाचे पूर्ण चित्रीकरण हे उक्षी गावातच स्थानिक कलाकारांना घेऊनच झाले आहे.  प्रेक्षकांनी अंतिम फेरीत निवड केलेल्या २४ लघुपटांमध्ये ‘ऑस्करची गोष्ट’ हा सामाजिक संदेश देणारा लघुपट सातव्या क्रमांकावर आहे.सुधीरने उक्षीसारख्या खेडेगावात राहून शिक्षण घेतले. कोकणातील नमन, जाखडी या पारंपरिक कला जतन करायला हव्यात, या ध्यासाने झपाटलेल्या सुधीरने आपल्याच गावातील तरुणांना आणि लहान मुलांना या लघुपटात संधी देत लघुपटाचा लेखक, दिग्दर्शक म्हणून या लघुपटावर मोहोर उमटवली आहे. कोणत्याही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये न जाता, आपल्या अनुभव आणि जिद्दीच्या जोरावर हा लघुपट तयार केला आणि त्याच जोरावर संपूर्ण पोस्ट प्रॉडक्शन, पोस्टर डिझाइन अशी जबाबदारीही लीलया पेलली.सुधीरने हिंदी सिनेमात काम केले. अनेक मराठी चित्रपट, मराठी मालिका, जाहिराती, विविध देशी आणि परदेशी माहितीपट यात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि आता आपल्याच गावात त्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा लघुपट तयार केला आहे. ५ जुलैपासून २ आठवडे हा फेस्टिव्हल जगभरात ऑनलाइन प्रदर्शित झाला.प्राथमिक फेरीत देश-विदेशातून १०८  विविध प्रकारच्या फिल्म्स आल्या होत्या. पहिल्या फेरीतच ‘ऑस्करची गोष्ट’ने १७ व्या स्थानावर बाजी मारली. अंतिम फेरीत जगभरातील प्रेक्षकांनी २४  लघुपटांना पसंती दिली. त्यात ‘ऑस्करची गोष्ट’ ७ व्या क्रमांकावर  आहे.पुढील आठवड्यात युकेतील  परीक्षक या २४ मधून एकूण ५ लघुपटांची निवड केली जाणार आहे. सुधीरला आता याच निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

संघर्षासह संदेशहीहा लघुपट शेतकरी विश्राम आणि त्याचा मुलगा संजय यांची ही गोष्ट आहे. वडिलांचा संघर्ष, मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठीची धडपड, लहान मुलांची कल्पनाशक्ती व निसर्गाकडे पाहण्याचा अथांगसारखा दृष्टिकोन, हे यातून दाखविण्यात आले आहे. यात पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, जीवन जगवा, अवयवदान व शिक्षणाचे महत्त्व आदी संदेश दिला आहे.

या फेस्टिव्हलमध्ये सादर झालेल्या १०८ उत्कृष्ट कलाकृती पाहता आल्या. ‘ऑस्करची गोष्ट’ची आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात अंतिम फेरीत निवड झाल्याने माझ्या संपूर्ण टीमला काम करण्याची अधिक प्रेरणा मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील फेस्टिव्हलमध्ये मला सहभागी होता आले, हा आनंद, अनुभव खूपच प्रेरणादायी आहे. - सुधीर घाणेकर, लेखक, दिग्दर्शक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMobileमोबाइलShootingगोळीबार