शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चिपळूणात हॉटेलमधील आचाराकडे सापडली पिस्तुल; ४६ राउंडसह २ फायटर जप्त

By संदीप बांद्रे | Updated: November 8, 2023 18:55 IST

चिपळूण : येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ...

चिपळूण : येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडील मुद्देमालही जप्त केला आहे. नीरज सिंह हिरा बिस्त (वय २१) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.चिपळूण मधील वालोपे परिसरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडे विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, बुधवारी दुपारी पोलिस पथकाने थेट वालोपे येथील माऊली अपार्टमेंटवर धडक दिली. पोलिसांनी नीरजच्या रूमची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल ताब्यात घेऊन नीरज सिंह बिस्ता याला अटक केली. पोलीस स्थानकात आणल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ही पिस्तुल त्याने कोणाकडून घेतली होती आणि कशासाठी बाळगली होती, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले असून त्यावरून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण