शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चित्तथरारक प्रसंग! गाडीसमोर बिबट्या येताच ‘त्या’ची वळली बोबडी, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 14:57 IST

परिसरात मुक्त संचार

गणपतीपुळे : नेवरे-काेलगेवाडीमार्गे काेतवडे रस्त्याने गणपतीपुळे येथे येत असताना अचानक गाडीसमाेर बिबट्या आला. या बिबट्याला पाहून गाडी चालकाची बाेबडीच वळली आणि गाडी नियंत्रित करेपर्यंत बिबट्याच्या पुढ्यात जाऊन थांबली. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने गाडी फिरवून पुन्हा काेलगेवाडी गाठली आणि सुस्कारा टाकला. हा प्रकार शनिवारी रात्री ७:३० वाजण्याच्या दरम्यान, काेलगेवाडी (ता.रत्नागिरी) येथे घडला.रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील ग्रामस्थ आणि गणपतीपुळे येथील पर्यटक निवासमधील कर्मचारी संदीप कृष्णा मोहित (४३, रा.गवाणवाडी-कोतवडे, रत्नागिरी) यांनी हा चित्तथरारक प्रसंग अनुभवला. ते शनिवारी रात्री ७:३० वाजण्याच्या दरम्यान नेवरे-कोलगेवाडी मार्गे कोतवडे या रस्त्याने गणपतीपुळेकडे येत हाेते. कोलगेवाडीच्या पुढे चढामध्ये अचानक गाडीसमाेर बिबट्या आला. बिबट्याला पाहताच त्यांची बाेबडीच वळली. त्याला बघिताच गाडीवर नियंत्रण मिळेपर्यंत गाडी त्या बिबट्याच्या समाेर जाऊन थांबली. प्रसंगावधान राखत संदीप मोहित यांनी तशीच गाडी वळवून पुन्हा सुरू केली आणि तिथून परत कोलगेवाडी गाठली.घाबरलेल्या अवस्थेत आलेल्या संदीप मोहित यांना ग्रामस्थांनी धीर दिला. त्यांना पाणी देऊन सावध केले. त्यानंतर, त्यांना घेऊन ग्रामस्थ घटनास्थळी आले. मात्र, त्यावेळी बिबट्या तेथून निघून गेला होता. त्यानंतर, संदीप मोहित हे गणपतीपुळेकडे आले आणि कामावर हजर झाले. या परिसरात दिसणाऱ्या बिबट्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

परिसरात मुक्त संचाररत्नागिरी तालुक्यातील नेवरे, कोतवडे, गणपतीपुळे, निवेंडी, धामणसे या परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. या परिसरात वेळोवेळी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन हाेत आहे, तसेच या परिसरातील कोंबडी, कुत्रे, मांजरे बिबट्याने फस्त केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग