शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, मात्र वाहतूक सुरळीतच

By संदीप बांद्रे | Updated: June 26, 2023 16:37 IST

परशुराम घाटातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष

चिपळूण : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाला दमदार सुरवात झाली आहे. यातच परशुराम घाटात किरकोळ दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. घाटातील एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण पुर्ण झाले असून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील घाटात एक-दोन दगड रस्त्यावर आले होते. गेल्या तीन वर्षापासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम रखडले होते. मात्र यावर्षी पावसाळ्यापुर्वी घाटातील डोंगर कटाई पुर्ण झाली असून काँक्रीटीकरणाचा एकेरी मार्ग पुर्ण झाला आहे. चौपदरीकरणातील बहुतांशी कामे मार्गी लागल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात दरडीचा धोका जाणवू लागला आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसात दोनदा किरकोळ स्वरूपाच्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. शनिवारी महाड हद्दीत असलेल्या परशुराम घाटात डोंगरातील काही प्रमाणात दगड रस्त्यावर आले होते. मात्र त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही. डोंगर कटाईनंतरच्या पहिल्याच पावसात दगड माती कोसळण्याचा धोका असल्याने दरडीच्या बाजूने एकेरी मार्गाने वाहतूक सुरू ठेवली आहे. डोंगराच्या वरील बाजूस असलेल्या घरांच्या सुरक्षेसाठी सरंक्षक भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र त्यास अद्याप सुरवात झालेली नाही. महाड हद्दीतील सरंक्षक भिंतीचा कामे अपुर्ण राहील्याने दरडीचा धोका कायम राहीला आहे. यामुळे परशुराम घाटातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन