शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९७२ मुंबईकरांना आरोग्याचा डोस

By admin | Updated: September 11, 2014 00:11 IST

आरोग्य विभाग : दीड लाख प्रवाशांची तपासणी

रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये गेल्या बारा दिवसांत जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य पथकांनी १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची तपासणी केली. त्यामध्ये ९७२ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असून, मलेरियाचे एकूण १७४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.गणेशोत्सवासाठी मुंबईहून बहुसंख्य चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, डेंग्यू या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात एस. टी., रेल्वे स्थानके आदी ठिकाणी आठ आरोग्य पथके तसेच महामार्गावर १७ ठिकाणी वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली होती. जिल्ह्यात दि. २५ ते आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली होती.या आरोग्य पथकांकडून चाकरमान्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मलेरियाच्या १७४ संशयित रुग्णांचे रक्त नमुनेही घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ९७२ चाकरमान्यांवर पथकाकडून औषधोपचार करण्यात आले. मलेरियाच्या संशयित रुग्ण आणि औषधोपचार करण्यात आलेल्या रुग्णांचा घरचा पत्ता घेऊन आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांच्या गावच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्यास कळविण्यात आले होते़ त्यामुळे त्या चाकरमानी असलेल्या रुग्णाच्या राहत्या घरीही औषधोपचार करण्याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली होती़ (शहर वार्ताहर)तपासणी केंद्रांचीही स्थापना१७४ मलेरियाचे संशयित रुग्ण सापडले.९७२ मुंबईकरांवर प्राथमिक उपचार.महामार्ग, रेल्वे-बस स्थानकावर तपासणी केंद्रांची स्थापना.१२ दिवस आरोग्य विभागाकडून तपासणी.डेंग्यू, काविळ, गॅस्ट्रो, स्वाइन फ्लूची शक्यता ध्यानी घेऊन आरोग्य विभागाचा उपक्रम.आरोग्य विभागाची सतर्कता.