शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

चाकरमान्यांच्या तपासणीसाठी ८०२ आरोग्य पथके कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पाेलीस व आराेग्य विभागही सतर्क ...

रत्नागिरी : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पाेलीस व आराेग्य विभागही सतर्क झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणी आराेग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागामध्ये तपासणीसाठी ८०२ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी आजपर्यंत एसटी, रेल्वेसह खासगी गाड्यांनी लाखभर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले होते. गणरायाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने मुंबईतील विविध स्थानकांमधून गाड्यांची व्यवस्था केली होती. जिल्ह्यात आतापर्यंत १२०० गाड्या दाखल झाल्या. त्यामधून सुमारे पन्नास हजारांहून अधिक चाकरमानी आले आहेत. कोकण रेल्वेच्या माध्यमातूनही हजारो प्रवासी आले आहेत. या सर्वांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे.

हे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून आपल्या गणेश भक्तांना व जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर, बसस्थानके व रेल्वेस्टेशन येथे तसेच गाव पातळीवर ग्राम कृती दल कार्यरत ठेवण्यात आलेले आहेत. गणेशोत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांची तपासणी आरोग्य पथकांमार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये महामार्ग, बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथे २५ आरोग्य पथके आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून ग्रामपातळीवर एकूण ७७७ पथके कार्यरत आहेत. गणेशोत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर व ॲंटिजन अशा एकूण ५,००० पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

----------------------------

दैनंदिन कीटकजन्य, जलजन्य आजाराच्या व साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे साथरोग प्रतिबंधक किट अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९ आजार व्यतिरिक्त इतर कोणत्याही साथ रोगाची लागण झालेली नाही. तरी कोविड-१९ आजार सदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

----------------------

तालुका महामार्ग, बसस्थानके, प्राथमिक आरोग्य केंद्र

रेल्वे स्थानकावर कार्यरत स्तरावरून ग्रामपातळीवरील

आरोग्य पथके कार्यरत आरोग्य पथके

मंडणगड १ २०

दापोली १ ४७

खेड ४ ११४

गुहागर १ ३०

चिपळूण ४ १३०

संगमेश्वर ६ ९१

रत्नागिरी ३ १८१

लांजा २ ६३

राजापूर ३ १०१

एकूण २५ ७७७