शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

जिल्ह्यात ८ उपकेंद्र बंद

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

महावितरणचा आडमुठेपणा : वीजपुरवठा नसल्याने ठप्प

रहिम दलाल - रत्नागिरी  -लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली ग्रामीण भागातील ८ उपकेंद्र वर्ष उलटले तरी वीजपुरवठा करण्यात आलेला नसल्याने ती बंद आहेत़ महावितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली़ मात्र, या उपकेंद्रांमधून गरजू, गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देता येत नसेल तर लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतींचा उपयोग काय, असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे़ रुग्णांना शासनाकडून मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली़ त्याचा हजारो रुग्णांनी फायदा करुन घेतला आहे़ तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातर्गतही शासनाने रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहे़ शासन दरवर्षी गरजू व गरिबांसाठीच्या आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़ मात्र, त्यासाठी लागणाऱ्या विजेसारख्या महत्त्वाच्या बाबीचा पुरवठा करण्यास महावितरणकडून चालढकल केली जात केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ३६८ उपकेंद्र आहेत़ याद्वारे जिल्ह्यातील हजारो रुग्णांना दररोज उपचार दिले जात आहेत़ रुग्णांना चांगली सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रही सुस्थितीत असणे आवश्यक आहेत़ त्यासाठी जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन ८ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़ या उपकेंद्रांच्या इमारती पूर्ण होऊन सुमारे दीड वर्ष उलटले तरी त्यांना वीज व पाणी पुरवठा देण्यात आलेला नाही़ महावितरणकडे विद्युत पुरवठ्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रस्ताव दाखल केला आहे़ मात्र, महावितरणकडून वर्ष उलटले तरी त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने अद्याप वीजजोडणी केलेली नाही़ त्यामुळे ही उपकेंद्र वीज आणि पाणी पुरवठा नसल्याने आजही बंद आहेत़ त्यामुळे महावितरण कंपनी वीज जोडणी आणि ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे या उपकेंद्राबाबत आरोग्य विभागाकडून महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र या आठपैकी एकाही उपकेंद्राला वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. वीजजोडणीच नसल्याने नव्याने बांधलेल्या या इमारतीत यंत्रणाही बसवलेली नाही. त्यामुळे नवीन असूनही इमारती ओस पडल्या आहेत. जनतेच्या आरोग्याबाबत महावितरणला किती कळवळा आहे, हेच यावरून दिसून येते.नवीन उपकेंद्र खालीलप्रमाणे आहेत़ तालुकाबंद उपकेंद्र संगमेश्वर बोंड्ये, कुचांबेचिपळूणकुंभार्लीखेडसवणस, गुणदेलांजाव्हेळराजापूरहसोळ, भूउपकेंद्रांना पाणी पुरवठ्याची अवश्यकताजिल्हा परिषद आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करुन आठ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़ ही उपकेंद्रे सुरु करण्यासाठी वीज पुरवठ्यासह पाणी पुरवठ्याची सोय असणे आवश्यक आहे़ मात्र, वीजपुरवठा तर नाहीच, शिवाय ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठाही करण्यात आलेला नाही़ त्या उपकेंद्रांच्या नवीन इमारती केवळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़ मुलभूत गरजांची व्यवस्था कधी होणार? असा सवाल होत आहे.