रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला असून, दिवसभरात केवळ ७५ रुग्ण सापडले आहेत. ११६ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर, एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १,२२९ बाधितांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मंडणगड तालुक्यात प्रथमच ऐन गणेशोत्सवामध्ये जास्त १६ रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. दापोली तालुक्यात ९ रुग्ण, खेड, गुहागरमध्ये प्रत्येकी ४ रुग्ण, चिपळूण, संगमेश्वरमध्ये प्रत्येकी ७ रुग्ण, रत्नागिरीत २७, लांजात केवळ एक रुग्ण सापडला आहे. राजापूर तालुक्यात दिवसभरात एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यात एकूण ७६,८७२ रुग्णसंख्या झाली आहे.
जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात एकमेव रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २,३७० झाली आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात ७३,२७३ कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३२ टक्के आहे.