शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे विकासासाठी ७० कोटींचा आराखडा

By admin | Updated: February 2, 2016 23:49 IST

अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती. वित्त व नियोजनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ (सर्वसाधारण)ची राज्यस्तरीय बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आदी उपस्थित होते. या बैठकीत वायकर यांनी विविध गोष्टींची मागणी केली. यात जिल्ह्यामध्ये १०५९ साकव असून, सद्य:स्थितीत ५९७ साकव नादुरुस्त आहेत. त्यासाठी सुमारे ७७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याने आवश्यक निधी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार नादुरुस्त, तसेच प्रस्तावित साकवांची पाहणी करून निधी देण्यात येईल, असे आश्वासन वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांना दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी नऊ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी थिबा पॅलेस ते भाट्ये बीच रोपवे, परशुराम ते गोवळकोट किल्ला रोपवे, शासकीय रोपवाटिकांची अत्याधुनिक नर्सरी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी बियाणे, अवजारे, कीटकनाशके, स्टार, शौचालये, आदी विविध मागण्याही पालकमंत्री वायकर यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी) ‘‘लोकमत’च्या वृत्ताची दखल अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.