रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून, शुक्रवारी दिवसभरात ६९ बाधित नवे रुग्ण सापडले. तर ७८ रुग्ण बरे झाले असून, तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये १,२७१ रुग्ण उपचारांखाली आहेत.
जिल्ह्यात ४,३४८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचणीत ३८, तर ॲंटिजन चाचणीत ३१ रुग्ण सापडले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील एक रुग्ण, दापोलीतील ७, खेडमधील ४, गुहागरात ३, चिपळुणात २१, रत्नागिरीतील १८, लांजातील ३ आणि राजापुरातील ४ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण ७६,७९७ रुग्ण झाले आहेत.
रत्नागिरी तालुक्यात दोघांचा, तर लांजात एकाचा असे तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. बाधितांच्या मृत्यूची संख्या २,३६९ झाली आहे. त्यांचा मृत्यू दर ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ७३,१५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२६ टक्के आहे.