रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी येण्यासाठी ६५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातून तसेच खासगी बुकींग सेंंटरमधूनही आरक्षण सुरु आहे.दापोली आगारातून मुंबई, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, कल्याण, नालासोपारा मार्गावर सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दापोली आगारातून बोरिवली, कल्याण, भांडुप, मुंबई, पुणे मार्गावर दहा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. चिपळूण आगारातून मुंबई, पुणे, चिंचवड, स्वारगेट, बोरिवली मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुहागर आगारातर्फे भांडुप, परेल, ठाणे, विरार, विठ्ठलवाडी, बोरिवली, मुंबई मार्गावर ११ गाड्यांचे नियोजन केले आहे. देवरुख आगारातून स्वारगेट, बोरिवली, मुंबई मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी आगारातून बोरिवली, मुंबई, पुणे मार्गावर पाच तर लांजा आगारातून मुंबई - बोरिवली मार्गावर सहा जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. राजापूर आगारातून बोरिवली, नालासोपारा मार्गावर दहा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय मंडणगड आगारातून बोरिवली, मुंबई, नालासोपारा, भार्इंदर, परळ मार्गावर पाच जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.संबंधित आगारातून या गाड्या मुंबईतील आगारात जाऊन तेथून प्रवाशांना घेऊन गावाकडे परतणार आहेत. दरवर्षी गणेशोत्सव कालावधीमध्ये प्रवाशांसाठी एसटीचे नियोजन करण्यात येते. आॅनलाईन आरक्षण सुविधा असल्याने एक महिना पूर्वीच आरक्षण सुविधा सुरु झाली आहे. गौरीगणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाचेही नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय महामंडळाने ग्रुप बुकींगसाठीही आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी गणेशोत्सवासाठी ६५ जादा गाड्या
By admin | Updated: August 12, 2014 23:21 IST