शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षण’कडे ६० लाख रुपये पडून

By admin | Updated: December 14, 2014 00:04 IST

सदस्य संतप्त : शाळा दुरूस्ती व कंपाऊंड वॉलची कामे रखडली

रत्नागिरी : जिल्हा नियोजन योजनेंर्गत आलेले ६० लाख रुपये धोरणात्मक शासन निर्णय उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉलची शेकडो कामे रखडली आहेत़ निधी आलेला असतानाही शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामाच्या याद्या तयार करण्यास उशिर झाल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा मोडकळीस आल्याने त्या धोकादायक स्थितीत आहेत़ मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोकादायक ठरु शकतात़ त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शाळा दुरुस्तीच्या मागणीला जोर धरला आहे़ त्यातच जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजार प्राथमिक शाळांना कंपाऊंड वॉल नाही़ शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ६० लाख रुपयांचा निधी आलेला आहे़शिक्षण समितीच्या मागील सभांमध्ये शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामासाठी निधी आलेला असताना त्यांच्या परिपूर्ण प्रस्तावांची यादी का तयार करण्यात आलेली नाही, असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला होता़ त्याबाबत सदस्यांकडून प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात येत होते़ जिल्हा नियोजनकडून आलेला ६० लाख रुपयांचा निधी पडून राहण्यास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत होता़ शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉलची कामांच्या प्रस्तावांच्या अंतिम याद्या उशिरा का होईना त्या तयार करण्यात आल्या आहेत़ मात्र, हा निधी खर्च करण्यासाठी ज्या प्रशासकीय नियमांचे मार्गदर्शक सूचनांचे धोरणात्मक शासन निर्णय जिल्हा परिषदेला अजूनही मिळालेला नाही़ त्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा नियोजन समितीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ मात्र, त्याबाबत हा निधी खर्च करण्याबाबत जिल्हा नियोजनकडून अद्याप शासन निर्णय प्राप्त न झाल्याने हा निधी जिल्हा परिषदेकडून पडून आहे़ त्यामुळे शासन निर्णय केव्हा येणार आणि निधी कधी खर्च करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शाळा दुरूस्ती व संरक्षण भिंत या दोन महत्वाच्या विषयांवरील अंतिम प्रस्तावाच्या याद्या तयार करण्यात आल्या असल्याने आता पुढील निर्णयाकडे लक्ष आहे. (शहर वार्ताहर)