शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

पाणी समस्येवर आता ५३ कोटींचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 01:15 IST

रत्नागिरी पालिका : शीळ, पानवल धरणावर मुख्य भिस्त

रत्नागिरी : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत: कायापालट होणार आहे. त्यासाठी शासनाच्या नगरोत्थान योजनेंतर्गत ५३.५३ कोटी रुपयांचे ‘वॉटर सोल्यूशन’ तयार करण्यात आले आहे. शीळ धरण व पानवल धरणावर आधारित हा प्रकल्प असून येत्या १५ दिवसात त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या आजच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून खिळखिळी झाली आहे. रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी भगदाडे पडल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. नगर परिषदेची पाणी वितरण व्यवस्था बाद झाली असून या योजनेचा पूर्णत: कायापालट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यानुसार शीळ धरणाच्या जॅकवेलपासून साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची १५ इंची जलवाहिनी बदलून तेथे १८ इंची जलवाहिनी उभारली जाणार आहे. त्यासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव मंगळवारी पार पडलेल्या रत्नागिरी पालिकेच्या सभेत मांडण्यात आला.शहरात आदमपूर, माळनाका, खडपमोहल्ला आणि पंधरामाड या चार ठिकाणी मोठ्या साठवण टाक्या उभारल्या जाणार आहेत. शहरातील ९५ किलोमीटर लांबीची २ इंची वितरण वाहिनी बदलून तेथे तीन ते चार इंची वितरण वाहिनी उभारली जाणार आहे.या नव्या योजनेनुसार, आधीच्या जलवाहिनीवरुन थेटपणे देण्यात आलेल्या ५८ जोडण्या तोडल्या जाणार आहेत. पानवल ते नाचणे जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंतची जलवाहिनी नवीन उभारली जाणार आहे. तेथील जलशुद्धीकरण केंद्राचाही विस्तार होणार आहे.रत्नागिरी शहरात एक लाख लोकसंख्येसाठी २२ दशलक्ष लिटर दररोज लागणारे पाणी या योजनेत निश्चित करण्यात आले असून दरडोई १३५ लिटर पाणी दिले जाणार आहे. सध्याच्या योजनेनुसार शीळवरुन सर्वाधिक ११ ते १२ एमएलडी पाणी उचलले जात आहे. उर्वरित २ किंवा ३ एमएलडी पाणी हे पानवल धरण, एमआयडीसी व नाचणे तलावातून उचलले जात आहे. पानवल धरण संपूर्णपणे नव्याने उभारले जाणार आहे. धरणापासून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी नव्याने उभारली जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही पाटबंधारे विभागामार्फत सुरु आहे. त्यामुळे नवीन योजनेत पानवल धरणात शीळ धरणाइतके महत्वाचे स्थान देण्यात येणार आहे.जून ते डिसेंबर या कालावधीत पानवल धरणातून १६ एमएलडी पाणी शहरासाठी उचलले जाईल. त्याचवेळी शीळ धरणातून सहा एमएलडी पाण्याची उचल केली जाईल. जानेवारी ते मे अखेरपर्यंत शीळ धरणातून १६ एमएलडी पाणी तर उर्वरित पाणी पानवल धरणातून उचलले जाणार आहे. एमआयडीसीकडून सध्या घेतले जाणारे पाणी पूर्णत: बंद केले जाणार आहे. या संपूर्ण योजनेची तपशिलवार माहिती सभागृहात उपस्थित महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अभियंता मुल्ला यांनी दिली. त्यानंतर लवकरात लवकर या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास सभागृहाने मंजूरी दिली. हा विषय सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला. पाणी विषयावरील या चर्चेत नगरसेवक उमेश शेट्ये, बंड्या साळवी, भैय्या मलुष्टे, मिलींद कीर, अशोक मयेकर, बाळू साळवी, मधुकर घोसाळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)जलमापक बंधनकारकया योजनेनुसार शहरातील प्रत्येक नळजोडणीसाठी पाणी मापक बसविणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. जर जलमापक (वॉटर मिटर) अचानक बंद पडले तर पर्यायी पाणीमापक नगर परिषदेकडून तात्पुरत्या स्वरुपात पुरविला जाईल. दुरुस्तीनंतर संबंधित जोडणीधारकाने पुन्हा जलमापक बसविणे आवश्यक आहे, असेही या योजनेचे स्वरुप आहे.