अडरे : लोकसंख्या कमी करण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येवर आळा बसावा, यासाठी शासनाने कुटुंबकल्याण नियोजन सुरु केले. गेल्या सहा महिन्यात कुटुंबकल्याण कार्यक्रमअंतर्गत एकूण ५१२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये स्त्रियांच्या ५०४ व पुरुषांच्या ८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाने कुटुंबकल्याण कार्यक्रम सुलभ व्हावा, यासाठी जनजागृती केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत अनेक सोयीसुविधा गरोदर माता, महिलांना व नवजात शिशुंना उपलब्ध करुन दिल्या आहेत. कुटुंबकल्याण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुटुंब संख्या नियंत्रित करुन वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत असतो. त्यासाठी अनेक वेळा प्रबोधनही करण्यात आले होते. हा कार्यक्रम चिपळूण तालुक्यातील प्राथमिक केंद्राअंतर्गत घेतला जातो. चिपळूण तालुक्याला यावर्षी १ हजार १४२ शस्त्रक्रिया करण्याचेउद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी सप्टेंबर महिनाअखेर ५१२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. चिपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कुटुंबकल्याण झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ११७ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कापरे अंतर्गत ८४चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खरवते केंद्राला ११४ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दादरअंतर्गत १२२ चे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी ५३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शिरगावअंतर्गत १२६चे उद्दिष्ट होते. यापैकी ५१ शस्त्रक्रिया झाल्या. अडरेअंतर्गत २०७ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६३ शस्त्रक्रिया झाल्या. सावर्डेअंतर्गत १८७चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६६ शस्त्रक्रिया झाल्या. फुरुस प्राथमिक आरोग्यकेंद्राला ७१चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३० शस्त्रक्रिया झाल्या. वहाळला ११४चे उद्दिष्ट होते, त्यापैकी ६३ शस्त्रक्रिया केल्या आहेत. आरोग्य विभागातर्फे विविध साथींच्या आजाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठीही ग्रामीण जनजागृती केली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आळा बसत असून कुटुंबकल्याण योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्याला उद्दिष्ट दिले होते. १ हजार १४२ दिलेल्या वार्षिक उद्दिष्टापैकी सप्टेंबरअखेर कुटुंब कल्याणच्या ५१२ शस्त्रक्रिया झाल्या आहे. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे. (वार्ताहर)सहा महिन्यात ५०४ महिला व ८ पुरूषांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याच्या प्रयत्नातला हा एक महत्त्वाचा उपक्रम आरोग्य विभागातर्फे राबवण्यात आला. चिपळूण तालुक्याला यंदा ११४२ उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुटुंब कल्याणचे काम सुरू असून, सप्टेंबरअखेर ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचे निष्पन्न होत आहे.
चिपळूण तालुक्यात ५१२ शस्त्रक्रिया
By admin | Updated: October 17, 2014 00:39 IST