शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला, चौघांचा मृत्यू; आतापर्यंत किती मिळाली भरपाई.. वाचा

By संदीप बांद्रे | Updated: March 19, 2025 13:50 IST

तर १५ गंभीर जखमी

संदीप बांद्रेचिपळूण : गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चाैघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर, तर एकजण किरकाेळ जखमी झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ काेटी ०९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.वर्ष २०२२-२३ मध्ये रानगव्याने केलेल्या हल्ल्यात सतीश शांताराम जाधव (रा. फुरूस), भिकाजी राघू माडवकर (रा. माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (रा. तळसर, चिपळूण) यांचा मृत्यू झाला. तर अरुण रेडीज (रा. चांदेराई, रत्नागिरी) यांचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

सह्याद्री खोऱ्यातील पातेपिलवलीतर्फ वेळंब, शेवरवाडी-नांदगाव, खानू-नवीवाडी व फुरूस (ता. दापाेली), पन्हाळकाजी व ताडील (ता. दापाेली), चिंचघर-खेड, तळसर-चिपळूण, चांदेराई व पाथरट (ता. रत्नागिरी), दोडवली-गुहागर, साखरपा संगमेश्वर या ठिकाणी वन्यप्राण्यांनी माणसांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू नाहीबिबट्या, रानगवा, रानडुक्कर, अस्वल, माकड व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, रानगवा, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला.

डेरवण येथे उपचार सुरूतोंडली-वारेली (ता. चिपळूण) गावच्या सीमेवर शनिवारी मध्यरात्री घरात घुसून बिबट्याने आशिष महाजन यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, डेरवण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय वन्यप्राण्यांकडून हल्ला होत नाही. वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १९२६ हा चोवीस तास कार्यरत असून, त्याची मदत घ्यावी. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचता येते. - गिरिजा देसाई, विभागीय वनअधिकारी, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग