शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

चिपळूण तालुक्यातील ४५ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: July 3, 2014 00:35 IST

प्रमाण वाढले : सार्वजनिक विहिरी सर्वाधिक दूषित

अडरे : चिपळूण तालुक्यातील कामथे प्रयोगशाळेत तपासलेल्या ४३७ पाणी नमुन्यांपैकी ४५ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये २४ सार्वजनिक विहिरींचे पाणी सर्वांत जास्त दूषित असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासले जातात. जून महिन्यात चिपळूण तालुक्यातील ४३७ नमुने घेऊन कामथे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ४५ ठिकाणांचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक कर्मचारी हे पाणीपुरवठा करणाऱ्या साधनांमधून पाण्याचे नमुने गोळा करतात. यामध्ये सार्वजनिक विहीर, तलाव, बोअरवेल, पाण्याची टाकी, नळपाणी पुरवठा करणारे नळ यांचा समावेश असतो. चिपळूण तालुक्यातील सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यामध्ये सावर्डे येथील पालवण काष्टेवाडी बोअरवेल, आगवे राणीमवाडी सार्वजनिक विहीर, असुर्डे - खापरेवाडी नळपाणी योजना, कोकरे - घाणेकरवाडी नळपाणी योजना, कोंढचीवाडी सार्वजनिक विहीर, नाभिकवाडी सार्वजनिक विहीर, कोकरे मोहल्ला नळपाणी योजना, बागवेवाडी सार्वजनिक विहीर, गुरववाडी सार्वजनिक विहीर, कामथे बौद्धवाडी नळपाणी योजना, कोंडमळा शिर्केवाडी सार्वजनिक विहीर, पिंपळ मोहल्ला सार्वजनिक विहीर, कासारवाडी सार्वजनिक विहीर, कापसाळ दुकानखोरी सार्वजनिक विहीर या ठिकाणांच्या टाकीतील पाणी पिण्यास अयोग्य आहे. कापरेअंतर्गत भोम येथील आदवडेवाडी सार्वजनिक नळपाणी, गांग्रई नवरंगवाडी सार्वजनिक नळपाणी पुरवठा, गावणंगवाडी सार्वजनिक नळपाणी पुरवठा, शिरगाव अंतर्गत मुंढे - कातकरीवाडी सार्वजनिक विहीर, खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरळ भुवडवाडी, नळपाणी, बौद्धवाडी नळपाणी, ओमळी सहाणवाडी नळ, ओमळी कांबळेवाडी विहीर, रेहेळेभागाडी, कान्हेरेवाडी विहीर, अडरे प्राथमिक केंद्रअंतर्गत निरबाडे निर्मळवाडी सार्वजनिक विहीर व वालोपे - गणेशवाडी सार्वजनिक नळपाणी योजना, दादर अंतर्गत कळकवणे मधलीवाडी सार्वजनिक नळ, आकले गुरववाडी सार्वजनिक विहीर, तिवरे गंगेचीवाडी बोअरवेल, तिवरे कातकरवाडी सार्वजनिक नळ, वहाळ पिलवली सुतारवाडी सार्वजनिक टाकी, पिलवली वाकडेवाडी सार्वजनिक विहीर, तुरंबव धनगरवाडी विहीर, कळंबट केरे सार्वजनिक नळ, कळंबट केरे बौद्धवाडी सार्वजनिक नळ, फुरुस कुटरे, शिर्केवाडी नळपाणी पुरवठा, कुटरेवरचीपेठ नळपाणी, डेरवण विठोबाचीवाडी विहीर, फौजदारवाडी, खालची बौद्धवाडी, सहाणवाडी विहीर, रामपूर वाघिवरे मोहल्ला सार्वजनिक नळपाणी, डुगवे सोनवणे बौद्धवाडी सार्वजनिक विहीर, गणेशवाडी व साखरवाडी सार्वजनिक विहीर येथील पाणी पिण्यास अयोग्य आहे. (वार्ताहर)