शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 13:17 IST

सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्यांचे आधारक्रमांक संलग्न

रत्नागिरी : सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ८० हजार ३७८ लोकसंख्येपैकी ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात आले आहेत. हे काम केवळ ३७ टक्के इतकेच झाले आहे.सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा, तसेच पात्र व्यक्तींनाच याचा लाभ व्हावा या उद्देशाने शासनाच्या पुरवठा विभागाकडून २०१२पासून शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे बनावट शिधापत्रिकांना चांगलाचा चाप बसला आहे. या मोहिमेनंतर शिधापत्रिकेवरील धान्य योग्य व्यक्तींनाच मिळावे, या हेतूने शासनाने शिधापत्रिकेवरील सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकांशी जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. सध्या अंत्योदय आणि प्राधान्य गटालाच सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा लाभ मिळत आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकाला शिधापत्रिकेवर नमूद केल्याप्रमाणे धान्य वितरण केले जाते. तर राष्ट्रीय धान्य सुरक्षा योजनेत समावेश असलेल्या प्राधान्य गटाला शिधापत्रिकेवरील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य धान्य देण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१४पासून घेण्यात आला आहे.प्राधान्य गटातील शिधापत्रिकेवरील एका तरी सदस्याचे आधारकार्ड संलग्न करण्याची सवलत सुरूवातीच्या काळात देण्यात आली होती. हे काम सुमारे ९० टक्के इतके पूर्णही झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक सदस्यांचे आधार संलग्न करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार २०३ शिधापत्रिकेवरील ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्य आधार संलग्न करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आधारशी संलग्न झालेल्या सदस्यांची संख्या कमी आहे. शिधापत्रिकेवरील सर्व सदस्य आधारशी संलग्न न झाल्यास त्या शिधापत्रिकेवरील धान्य वितरण थांबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.चौकटआधार मशीनची संख्या कमीआधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्याचे कामी हाती घेण्यात आले असले तरी १२ वर्षाखालील मुल आणि ६० वर्षावरील ज्येष्ठांचे ठसे घेण्यात अडचणी येत आहेत. त्यातच जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी आधार मशीन सुरू असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRatnagiriरत्नागिरी