आवाशी : बोरिवली ते चिपळूण प्रवासात एकूण ४४ प्रवाशांना घेऊन येणार्या एस. टी. बसला पिरलोटे येथे अपघात झाला. यात ३५ प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. बोरिवलीहून चिपळूणकडे जाणारी (एमएच २० बीएल १७६५) ही बोरिवली स्थानकातून रात्री ९.३० वाजता सुटलेली जादा गाडी चालक बळीराम संभाजी सुर्वे (३५, नांदेड) हे घेऊन येत होते. पिरलोटे येथील एका अवघड वळणावर झोप अनावर झाल्याने गोवा ते मुंबई असा औषधे घेऊन जाणारा टेम्पो (एमएच ०४ एफयू ३८०७) चालक विकास जेधे (३३, मुंबई) याच्यावर समोरासमोर धडकून हा अपघात घडला. यावेळी बसमध्ये एकूण ४४ प्रवासी, दोन चालक व दोन वाहक असे ४८ जण होते. पैकी ३५ प्रवासी जखमी झाले. यामध्ये रामचंद्र मिसाळ (४४, रेदळे-शिरळ, चिपळूण), मीनल मोरे (३५), सुषमा मोरे (५७, कांदिवली), अरुण डिंगणकर (२६, मिरारोड), उदय लाड (४२, बोरिवली), रुपेश डिंगणकर (२२, मिरारोड), रचना पवार (५०, बोरिवली), शमा चौगुले, सुवर्णा चौगुले (४०, गोरेगाव), अर्चना चोगले (२४, असुर्डे), निकिता चिमणे (१७, भरणे, खेड), विद्या चिमणे (३५, भरणे), वैशाली मोहिते (२४), प्रेमलता मोहिते (५२, बोरिवली), चंद्रकांत गोरिवले (४८, नादरखेरकी), स्वप्नाली मोहिते (२४, कापरे), जयराम मोहिते (४५, बोरिवली), मनिषा राणे (३७), हर्ष राणे (९, गोरेगाव), वेदिका चिमणे (१४, भरणे), रोहित जाधव ९, अंधेरी), राजेंद्र पवार (५४, बोरिवली), मोहन मोरे (६३, कांदिवली), अंजली राजपूरकर (६३), नीलेश राजपूरकर (३३, दहिसर), स्मृती चव्हाण (३७), संतोष चव्हाण (४४, बोरिवली), रवी मोरे (३४, दिवाणखवटी), अमोल कदम (२०, चिवेली), विष्णू अभियान सोनवणे (२९), युगंधरा पवार (२०), प्रणाली पवार (२३, बोरिवली), मंगेश पंडित (४९), मंजिरी पंडित (४५, बोरिवली), लावण्या धनावडे (४, तुरळ संगमेश्वर) हे प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर परशुराम रुग्णालयातील डॉ. राजन पंडित, डॉ. अजित आठवले, डॉ. दत्तात्रय साळवी, डॉ. अशोक पवार, डॉ. अशोक शिंदे, सहकारी उपचार करीत आहेत. किरकोळ जखमींना एस. टी. प्रशासनाकडून रोख पाचशे रुपये व अधिक जखमींना एक हजार रुपये रोख तत्काळ मदत जाहीर करण्यात आल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी भास्कर कुरतडकर, रत्नागिरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सांगितले. अपघातानंतर चिपळूणचे आगारप्रमुख सय्यद, रणजित राजेशिर्के, राजू पाथरे, वसंत भोजने, खेडचे डी. एस. रिमगल, सिद्धार्थ मर्चंडे, विठ्ठल जाधव, विश्वनाथ पिंगळे यांनी तत्काळ भेट देऊन जखमींची विचारपूस केली. (वार्ताहर)
बोरिवली-चिपळूण एसटी बस अपघातात ३५ प्रवासी जखमी
By admin | Updated: May 16, 2014 00:28 IST