शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३३ केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड, रत्नागिरीकर अंधारात; कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने वीज पुरवठा पूर्ववत

By मेहरून नाकाडे | Updated: June 16, 2023 15:33 IST

रत्नागिरी : रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बिघाड झाला व शहराला विद्युत पुरवठा करणारी ...

रत्नागिरी : रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बिघाड झाला व शहराला विद्युत पुरवठा करणारी ३३/११ केव्ही हार्बर व राहटाघर ही दोन उपकेंद्रे दि.१३ जून रोजी रात्री ९.३० वाजता बंद पडली. शहरातील ३५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला. याबाबतची सूचना उपकेंद्रातील यंत्रचालकाने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना दिली. तात्पुरती उपाययोजना करून रत्नागिरी शहर शाखाधिकारी कौस्तुभ वासावे यांनी पर्यायी विद्युत वाहिनीद्वारे २० मिनिटांच्या आत वीज पुरवठा पुर्ववत करून ग्राहकांना दिलासा दिला.मात्र वीजपुरवठा वारंवार चालू-बंद होत असल्याने बिघाड शोधून दुरूस्ती करणे आवश्यक होते. त्यासाठी काैस्तुभ वासावे यांनी सहकारी जनमित्रांना घेत ३३ केव्ही विद्युत वाहिनीवरील बिघाड शोधण्यासाठी रात्रीची गस्त सुरु केली. अंधार, मुसळधार पाऊस अशा परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांची रत्नागिरीतल्या खालची आळी भागात हार्बर उपकेंद्र ते कुवारबाव उपकेंद्र या ३३ केव्ही विद्युत वाहिनीची गस्त सुरु होती. रात्रीची वेळ व कमी मनुष्यबळ असल्याने त्यांनी एमआयडीसी शाखाधिकारी गणेश पखवाने व शिरगांव शाखाधिकारी राम बोबडे यांच्याकडे सहकार्य मागितले. तातडीने दोघेही जनमित्रांसह मदतीला धावले. त्यावेळी क्रांतीनगरजवळील विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड सापडला मात्र दोन वाहिन्या एकाच खांबावर असल्याने तो दुरूस्त करण्यासाठी शिरगाव उपकेंद्राचा विद्युत पुरवठा बंद करावा लागणार होता. शिवाय १३ मीटर उंचीचा वीजखांब, त्यावर चढून काम करणे कठीण होते. रात्री साडेबारा वाजता दुरूस्तीचे काम सुरू झाले. वीज खांबावर चढलेल्या रुपेश लांबे व मुकूंद चितळे, रवी विटकर, सत्यजित सणगरे यांनी विशेष परिश्रम घेत नादुरूस्त पिन इन्सुलेटर बदलून रात्री सव्वा एक वाजता तिन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत केला. ३५ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा उजेड आला. उजेड पेरणाऱ्या या वीज कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र वीज पुरवठा खंडित झालेनंतर नेमकी समस्या ओळखून वीजपुरवठा पूर्ववत करणे कसोटी असते. पावसाळ्यात तर जोखीम घेत जबाबदारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजmahavitaranमहावितरण