शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोटेतील थर्मोलॅब कंपनीतील ३२ कामगारांना अचानक कामावरून काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:52 IST

कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आवाशी : गेले अनेक महिने हाताला द्यायला कामच नसल्याने कंपनी बंद करत असल्याचे कारण देत लाेटे (ता. खेड) येथील थर्माेलॅब कंपनीने मंगळवारी (२७ डिसेंबर) अचानक ३२ कामगारांना अचानक कामावरून काढले. कमी केलेल्या कामगारांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत कंपनी प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या कामगारांकडून माहिती घेतली असता आम्ही नेहमीप्रमाणे सकाळच्या पाळीत काम करण्यासाठी कंपनीत आठ वाजता आलो. मात्र, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रवेशद्वारावरच रोखून तुम्हाला आजपासून कामावर येण्यास बंदी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तशा प्रकारची सूचना नोटीस त्यांनी प्रवेशद्वारावर लावल्याचेही सांगितले. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला खूप विनंती केली. मात्र, व्यवस्थापन आपल्या निर्णयाशी ठाम राहिले आहे. कार्यालयीन कर्मचारी व व्यवस्थापकाला कमी करण्यात आले आहे.

याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी हर्षा सावंत यांची भेट घेऊन माहिती घेण्यात आली. त्यांनी सांगितले की, ही कंपनी स्वतःचे असे कोणतेच उत्पादन घेत नाही. वसाहतीतील यूएसव्ही या कंपनीचे जॉबवर्क करते. काही दिवसांपूर्वी यूएसव्ही कंपनीने गुजरात - वडोदरा येथे स्वतःच्या मालकीची कंपनी स्थापन केली. त्यामुळे हे काम आमच्याकडून काढून घेतले. परिणामी आमच्याकडे कामगारांना काम देण्यासाठी कामच शिल्लक राहिलेले नाही. ही वस्तुस्थिती असून, याची कल्पना आमच्या सर्व कामगारांना आहे. त्यामुळे नाईलाजाने कंपनी बंद करणे भाग पडत आहे. आम्ही नियमानुसार कामगारांना देणे असणारी त्यांची देणी देऊन त्यांना सेवामुक्त करीत आहोत, असे सावंत यांनी सांगितले.

  • कंपनीत अन्य एका विभागात ठेकेदारी पद्धतीचे काम सुरू आहे. त्या कामगारांचे काय?
  • गेली तीस वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कामगारांना केवळ दोन महिन्याची ग्रॅज्युइटी?
  • काही कामगार एका युनियनचे सभासद असून, युनियनच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

हिशाेबाचा धनादेश तयारतसेच तुमचा या महिन्याचा पगार, सर्व लिगल ड्युज व दोन महिन्यांची ग्रॅज्युइटी असा सर्व हिशाेबाचा धनादेश तयार आहे तो घेऊन घरी जावे. इथून पुढे कामावर येऊ नये. आम्ही कंपनी बंद करीत आहोत, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :jobनोकरी