शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख बालकांना गोवर रूबेला लसीचे सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:32 IST

बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर - रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ २७ रोजी शहरातील दामले विद्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख बालकांना गोवर रूबेला लसीचे सुरक्षा कवचजिल्ह्यात २७ रोजी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

रत्नागिरी : बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर - रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ २७ रोजी शहरातील दामले विद्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.गोवर रूबेला हे विषाणूपासून होणारे आजार आहेत. त्यापासून मुलांचे रक्षण करण्यासाठी गोवर - रूबेला लसीकरण या राष्ट्रीय अभियानाची सुरूवात जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून होत आहे. याविषयी माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, डॉ. चंद्रकांत शेरखाने, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ तसेच अन्य अधिकारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ही लस ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असून शाळाबाह्य मुलेही यापासून वंचित राहू नये, यासाठी शाळा बाह्य ठिकाणीही गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम सुरू रहाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणीही लसीकरणासाठी १४१ फिरती पथके तैनात रहाणार आहेत. यासाठी आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यापासून नियोजन करण्यास सुरूवात केल्याने आता प्रशासन प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी धन्यवाद दिले.

टॅग्स :HelenहेलनRatnagiriरत्नागिरी