शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रत्नागिरी जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या इमारतीत, ३ कोटीचा निधी मंजूर

By रहिम दलाल | Updated: February 23, 2024 13:24 IST

स्वनिधीची अट रद्द

रहिम दलालरत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र चकाचक नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने ३ कोटी ९ लाख रुपये मंजूर केले असून, लवकरच ही कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे आता या ग्रामपंचायतींचा कारभार नवीन इमारतीतून चालणार आहे.गावासह वाडी, वस्त्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाची ध्येय - धोरणे ठरविली जातात. गावातील नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येते. प्रत्येक गावाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येते.गेल्या काही वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगातून कोट्यवधींचा निधी हा थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर थेट जमा केला जातो. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती नादुरुस्त आहेत. आजही काही ग्रामपंचायती स्वत:च्या मालकीच्या नसून त्या भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर गळती लागल्यामुळे काही ग्रामपंचायतींची कागदपत्रेही खराब झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यासाठी मोडकळीस आलेल्या इमारतींना नवा लूक देण्यासाठी नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत.प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतींच्या नवीन इमारती बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. त्याप्रमाणेच सन २०२३-२४ या वर्षामध्ये २० ग्रामपंचायतींना नवीन इमारती देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

अनुदान किती मिळणार?एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या - १२ लाख रुपये१ ते २ हजार लोकसंख्या - २० लाख रुपये२ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या - २५ लाख रुपये

स्वनिधीची अट रद्दयापूर्वीच्या योजनेमध्ये ग्रामपंचायतींना १५ ते २० टक्के स्वनिधीची अट घालण्यात आली होती. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे इमारतच नाही, त्यांना स्वनिधीसाठीही धडपड करावी लागत होती. मात्र, ही अट रद्द करण्यात आल्याने ग्रामपंचायतींना आता इमारत बांधकामासाठी १०० टक्के निधी दिला जात आहे.

पाच वर्षात मंजूर झालेला निधी

वर्ष - मंजूर ग्रामपंचायती - रक्कम (लाखात)२०१९-२० - ११  - १३५.००२०२०-२१ - २०  -  २४०.००२०२१-२२ - १६  - २३२.००२०२२-२३ - २७  - ४२२.५०२०२३-२४ - २०  - ३०९.००एकूण - ९४  - १३३८.००

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत