गुहागर : गुहागर तालुक्यातील हेदवी येथे दोन गटांत हाणामारी झाली. त्यानंतर झालेल्या परस्परविरोधी तक्रारींनंतर एका गटातील ४० पैकी १७ जणांना अटक होऊन २१ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दुसऱ्या गटातील १८ पैकी १० जणांना अटक होऊन जामीनावर मुक्तता करण्यात आले आहे.हेदवी - भंडारवाडा येथे हळदणकर व गडदे या दोन गटांमध्ये गेले काही दिवस पूर्ववैमनस्यातून एकमेकांविरोधात राग धूमसत होता. रविवारी सायंकाळी ७ वाजता जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर सुरेश दशरथ गडदे (५०) हेदवी यांनी ४० जणांविरोधात फिर्याद दिली. यामधील १७ जणांना अटक होऊन २१ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या आरोपीना रत्नागिरी येथील विशेष कारागृहामध्ये ठेवण्यात आले आहे.दुसऱ्या गटातील नीलेश हळदणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील गजानन धोंडू गडदे (५६), विकास दशरथ गडदे (५५), उदय रघुनाथ गडदे (४२), अशोक शंकर गडदे (५५), सिद्धेश गजानन गडदे (२६), कल्पेश अशोक गडदे (२६), किरण विलास गडदे (३३), संजय रघुनाथ गडदे (४३), प्रकाश चंद्रकांत गडदे (२९), संकेत चंद्रकांत गडदे (२०) यांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता जामीनावर मुक्तता करण्यात आली. या मारहाणीत प्रमोद गडदे, रघुनाथ गडदे, गजानन पवार व नीलेश हळदणकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
हेदवीतील हाणामारीप्रकरणी २७ जणांना अटक
By admin | Updated: June 11, 2014 00:43 IST