शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अडीच महिन्यात ८ कोटी

By admin | Updated: July 21, 2016 00:56 IST

महामहसूल : महावितरणच्या आॅनलाईन पद्धतीला पसंती

रत्नागिरी : वीजबिल भरण्यासाठी दरमहा रांगेत उभे राहण्यापेक्षा घरबसल्या आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांची पसंती अधिक आहे. मे महिन्यापासून १६ जुलैअखेर जिल्ह््यातील ५५ हजार ४३९ ग्राहकांनी वीजबिल आॅनलाईन भरणा केले असून, यातून ८ कोटी ४८ लाख ७५ हजार ५४० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.मे महिन्यामध्ये २१ हजार ४६६ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्याने यातून ३ कोटी १४ लाख ६५ हजार ८९५ रूपयांचे उत्पन्न महावितरणला मिळाले. तर जून महिन्यामध्ये २० हजार ४४० ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ३ कोटी ३६ लाख २ हजार ७९५ रूपये तर जुलै महिन्याच्या १६ तारखेपर्यंत १३ हजार ५३३ ग्राहकांनी वीजबिल आॅनलाईन भरणा केले असून, यातून १ कोटी ९८ लाख ६ हजार ८५० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.सध्या स्मार्टफोनचा वापर वाढल्याने इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध होते. यामुळे ग्राहक सर्रास या आॅनलाईन सुविधांचा वापर करू लागले आहेत. या आॅनलाईन वीजबिल भरण्यातून महावितरणला महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न प्राप्त होत आहे.मे महिन्यामध्ये चिपळूण विभागातील ५ हजार ७५० ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्याने ७९ लाख ५१ हजार ६३० रूपये, खेड विभागातील ४३६१ ग्राहकांकडील वीजबिलांतून ७५ लाख २५ हजार २४० रूपये, रत्नागिरी विभागातील ११ हजार ३५५ ग्राहकांकडील वीजबिल भरण्यातून १ कोटी ५९ लाख ८९ हजार २५ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.जून महिन्यात चिपळूण विभागातील ५ हजार ५५४ ग्राहकांकडील वीजबिल भरण्यातून ८० लाख ६९ हजार ८४० रूपये, खेड विभागातील ४१४६ ग्राहकांकडून ९२ लाख ७१ हजार ११० रूपये, रत्नागिरी विभागातील १० हजार ७४० ग्राहकाकडील वीजबिल भरल्यातून १ कोटी ६२ लाख ६१ हजार ८४५ रूपये तसेच १६ जुलैअखेर चिपळूण विभागातील ३ हजार ३२७ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्याने ४७ लाख ९९ हजार ३७० रूपये, खेड विभागातील २ हजार ८४५ ग्राहकांकडून ५५ लाख २५ हजार ११० रूपये, रत्नागिरी विभागातील ७ हजार ३६१ ग्राहकांकडून ९४ लाख ८२ हजार ३७० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)