खेड : पावसाळ््यातील साथीच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून तालुक्यातील २४ जोखीमग्रस्त गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. विनोद अभिवंत यांनी दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय वैद्यकीय पथकाची निर्मिती करण्यात आली आहे़ तालुक्यातील तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बोरघर, खवटी, कशेडी, सुमारगड आणि धनगरवाडीही गावे जोखीमग्रस्त म्हणुन घोषीत केली आहेत़ फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात चिंचघर प्रभुवाडी,चाकाळे, आंबवली किंजळे हे गाव साथग्रस्त म्हणुन जाहीर करण्यात आले असून भरणे नाका, सुकिवली, उधळे बु़, कळबणी बु़, चाटव, भरणे नाका, नांदीवली आणि अस्तान ही गावे जोखीमग्रगस्त आहेत़ लोटे परिसरातील कोतवली टेप भोईवाडी, शेल्डी हेदवाडी, पायरवाडी, सोनगाव भोईवाडी, शिव बोरज हे गाव साथग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून अलसुरे मोहल्ला, आयनी भोईवाडी, लवेल, शिव बुद्रुक भोईवाडी आणि आष्टी मोहल्ला हि गावे जोखीमग्रस्त म्हणुन घोषीत करण्यात आली आहेत. या सर्व भागात आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित यंत्रणेकडून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
खेडमध्ये २४ गावे जोखीमग्रस्त जाहीर
By admin | Updated: June 22, 2015 00:23 IST