शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दापाेलीत पकडले २२० किलाे गाेमांस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

दापोली : शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता, त्यात दापाेली पाेलिसांना गाेमांस आढळले. या गाडीतून पाेलिसांनी ...

दापोली : शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता, त्यात दापाेली पाेलिसांना गाेमांस आढळले. या गाडीतून पाेलिसांनी तब्बल २२० किलाे गाेमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी मंडणगडमधील दाेघांना अटक केली असून, त्यांना मदत करणाऱ्या अन्य दाेघांचा पाेलीस शाेध घेत आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, दापोली पोलीस रविवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना काळकाई कोंड परिसरात एक मारुती ओमनी गाडी दिसली. ही गाडी मंडणगड तालुक्यातील लाटवण येथून दापाेलीत आली हाेती. पाेलिसांनी या गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये २२० किलो गोमांस सापडले. याप्रकरणी पाेलिसांनी अल्ताफ पेटकर (४८) व जुबेर खलफे (४०) या मंडणगड येथील दाेघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना मदत करणाऱ्या मुस्तीद खलिपे व अजमल पेटकर यांचा दापोली पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या दाेघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५चे कलम ५ (ब), (क) ९ (अ) व मोटर वाहन कायदा कलम ३/ ११८, १३०, १७७, १३३, १९४ व भारतीय दंड विधान कलम ४२९, ३४, २२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.