शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवकालीन पालगडावर सापडले २२ तोफगोळे; पाहण्यासाठी ग्रामस्थांची तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 22:28 IST

शिवजयंतीच्या तयारीसाठी गेलेल्या तरुणांना सापडले तोफगोळे

- शिवाजी गोरे 

दापोली - पालगड: रत्नागिरी जिल्ह्यातील शिवकालीन पालगड किल्ल्यावर  शिवजयंतीच्या पुर्व संध्येला तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना  22 तोफगोळे सापडले. झोलाई स्पोर्ट्स पालगड दरवर्षी पालगड किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात. याही वर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली .

दापोली तालुक्यातील पालगड आणि खेड  तालुक्यातील घेरा पालगड या दोन गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवकालीन पालगड किल्ल्यावर  शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना एकूण 22 तोफगोळे सापडले आहेत. उत्साही तरूणांनी या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यासाठी एका ठिकाणी खोदकाम केले. सुरुवातीला त्यांना एक गोळा सापडला. मात्र आणखी खोदकाम केले असता त्यांना एकूण 22 तोफगोळे सापडल्याने ते पाहण्यासाठी ग्रामस्थांसह इतरांनी याठिकाणी गर्दी केली होती. मंडळाकडून या तोफ गोळ्यांची पूजा करण्यात आलीदापोली तालुक्यातील पालगड किल्ला दुर्लक्षित किल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु अलीकडेच या ठिकाणी दर वर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी काही तरुण मंडळी या किल्ल्यावर जात आहेत. सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील शिवप्रेमी किल्ल्यावर दाखल झाले व त्यांनी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली. परंतु यावर्षी या किल्ल्यावर शिवकालीन तोफगोळे सापडून आल्याने इतिहास प्रेमी चांगलेच सुखावले आहेत.