शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

रत्नागिरी जिल्ह्यात २ अपघातात २ ठार

By admin | Updated: June 1, 2014 00:45 IST

संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील दुर्घटना

संगमेश्वर/रत्नागिरी : शुक्रवारपाठोपाठ आज शनिवारीही मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच होती. आज रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन ठार १४जण जखमी झाले. एक अपघात पालीनजीक कापडगावजवळ झाला. त्यात ट्रकवर मिनी लक्झरी आदळून एकजण ठार झाला. दुसर्‍या अपघातात गोळवशी टप्पा (संगमेश्वर) येथे टाटा सुमो उलटल्याने एकजण ठार झाले. या दोन्ही अपघातांमध्ये एकूण १४ जण जखमी आहेत. त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिला अपघात संगमेश्वरजवळील गोळवशी टप्पा येथील हॉटल मुकुंद कृपाजवळ पहाटे ५.४५ वाजता झाला. भांडूप मुंबई येथून कणकवलीला मानव अधिकार पदाधिकार्‍यांना घेऊन चाललेली टाटासुमो (एमएच-0३/एएफ८३६७) रस्त्याच्या कडेला गटारात पडली. त्यात एक ठार व ९ जण जखमी झाले. अरूण संभाजी जगताप (५०, रा. भांडुप) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या अपघातातील अन्य जखमी सुरेश बाबूराव मोरे, (५०, भांडुप, चालक), अभिमन्यू नामदेव घुगरे (५८ भांडुप), सुधीर जगन्नाथ कदम (भांडुप), प्रभाकर शंकरराव सोमकुवर (४९, जोगेश्वरी, मुंंबई), किशोर पांडुरंग तळेकर (४६, कल्याण), मोहन यशवंत कांबळी, दत्तात्रय रामनाथ म्हात्रे (२८), विजय लोंढे (अंधेरी) दीपक मोरे या सर्व जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या संगमेश्वर येथील रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरा अपघात पालीनजीक कापडगाव येथील सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रकवर एक मिनी लक्झरी आदळली. ट्रक (एएच-0६ एसी ४६८५) गोव्याकडून मुंबईला तर लक्झरी (एमएच-0४/एफके २५०३) मैत्री पार्क, चेंबूर येथून गोव्याकडे जात होती. एका वळणावर वेग नियंत्रणात न राहिल्याने लक्झरी ट्रकवर आदळली. त्यात ट्रकचालक अरूण मंगर रजक (३३, रा. असूरांद, झारखंड) हा जागीच ठार झाला. लक्झरीचा चालक नितेश शांताराम लोंढे (३३, कलेक्टर कॉलनी, चेंबूर) केबीनमध्ये अडकला. त्याला लोकांनी क्रेन आणून बाहेर काढले. तो गंभीर जखमी आहे. सुहास चंद्रकांत गुरव (३६, चेंबूर), तुषार तुकाराम खवळे (३६, चेंबूर, दुसरा चालक), संतोष पांडुरंग अडाल (३३, गाडीचा मालक) हे या अपघातात जखमी झाले असून, त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या हातखबा येथील रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक व्ही. के. शिंदे, उपनिरीक्षक देशमुख, पाली क्षेत्राचे आर. डी. चव्हाण, प्रकाश कदम, यादव, रेवणे हातखबा वाहतूक शाखेचे विजय यादव दाखल झाले होते. अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी अमोल सावंत, मिलिंंद बेंडके, उदय नागले, संजोग वेतोस्कर, उमेश नागले, गोट्या शिंंदे, श्याम जाधव, दत्ता कोरे, विशाल साळुंखे, सुनील चव्हाण आदी तरुणांनी प्रयत्न केले. अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त लक्झरीचा समोरून चक्काचूर झाला आहे. (प्रतिनिधी)