ऑनलाइन वीज बिले भरल्यामुळे १९४ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:47+5:302021-04-13T04:30:47+5:30

रत्नागिरी : कोरोनाकाळात ग्राहक घराबाहेर पडणे टाळतात. शिवाय वीज बिले भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहून वीज ...

194 crore revenue due to online payment of electricity bills | ऑनलाइन वीज बिले भरल्यामुळे १९४ कोटींचा महसूल

ऑनलाइन वीज बिले भरल्यामुळे १९४ कोटींचा महसूल

Next

रत्नागिरी : कोरोनाकाळात ग्राहक घराबाहेर पडणे टाळतात. शिवाय वीज बिले भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहून वीज बिल भरण्याऐवजी घरबसल्या ग्राहकांना वीज बिले भरता यावीत यासाठी ‘ऑनलाइन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १७ लाख ३८ हजार ५६ वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीज बिल भरल्यामुळे १९४ कोटी ९२ लाख रुपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.

चिपळूण विभागातील चार लाख १७ हजार ९७० ग्राहकांनी ४६ कोटी ९० लाख, खेड विभागातील ४ लाख २६ हजार १३१ ग्राहकांनी ४९ कोटी ४६ लाख, रत्नागिरी विभागातील ८ लाख ९३ हजार ९५५ ग्राहकांनी ९८ कोटी ५५ लाख रुपये ऑनलाइन भरले आहेत. विशेष म्हणजे रत्नागिरी शहरातील ग्राहकांचाही ऑनलाइन बिल भरण्याकडे कल वाढत आहे. शहरातील एक लाख ७५ हजार ८३३ ग्राहकांनी ३४ कोटी ३१ लाख ५९ हजार रुपयांची बिले ऑनलाइन भरली आहेत.

लघुदाब वीज ग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल वॉलेट, मोबाइल बँकिंगद्वारे वीज बिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सवलत देण्यात येत आहे. याआधी नेट बँकिंगचा अपवाद वगळता वीज बिलांचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते; परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डेबिट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइनद्वारे होणारा वीज बिल भरणा आता नि:शुल्क आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीज बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ऑनलाइन वीज बिल भरण्याची सुविधा वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणने लघुदाब वीज ग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी मोबाइल अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीज बिल पाहणे आणि ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाइल वॉलेट व कॅश कार्डस्‌चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीज ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे.

ऑनलाइनद्वारे वीज बिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाइटवर व मोबाइल अ‍ॅॅपवर मागील वर्षभराच्या महिन्यातील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीज बिल दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीज बिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील दिला जात आहे.

Web Title: 194 crore revenue due to online payment of electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.