शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

१७ दिवस, तब्बल ६,२१२ किलोमीटर प्रवास; रत्नागिरीतील हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा

By शोभना कांबळे | Updated: June 24, 2023 13:43 IST

प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते

रत्नागिरी : हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा  दुचाकीवरून पूर्ण केली. १७ दिवसांत त्यांनी दोन दुचाकीवरून तब्बल ६,२१२ किलोमीटरचा टप्पा पार केला. यात लांजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सेवक आझाद विचारे यांच्यासोबत प्रतीक विचारे, अमर विचारे आणि विनायक विचारे यांचा सहभाग होता.   १ जून रोजी सकाळी या चाैघांचा प्रवास हातखंबा येथून दोन दुचाकीवरून सुरू झाला. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्याेतिर्लिंगाचे दर्शन घेत ते मध्यप्रदेशात पोहोचले. तेथे त्यांनी ओंकारेश्वर व उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. आग्रा येथील ताजमहाल पाहून ते हरिद्वारला गेले. तिथे सोमप्रयाग, गाैरीकुंड तिथून केदारनाथपर्यंतचे २२ किलोमीटरचे अंतर पायी पाच तासात पार केले. तिथे गर्दी असल्याने सकाळी नऊ वाजता रांगेत उभे राहिल्यानंतर तब्बल दहा तासानंतर सायंकाळी सात वाजता त्यांना केदारनाथ दर्शन झाले.तिथून पुन्हा सोमप्रयाग येथे येऊन त्यांनी पुढील धाम बद्रीनाथचा प्रवास सुरू केला. वाटेत आशिया खंडातील सर्वात उंचावर असलेल्या शिवलिंग तुंगनाथचे तीन किलोमीटर पायी ट्रेक करत त्यांनी दर्शन घेतले. बनियाकुंडे येथे त्यांनी दाेन अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानात वास्तव्य केले. तिथून बद्रीनाथ आणि गंगोत्री या पुढील धामांकडे प्रवास करताना पायी ट्रेक करत अनेक स्थळांचे दर्शन घेतले.या प्रवासादरम्यान बिपरजाॅय चक्रीवादळ अरबी समुद्रातून पुढे सरकत असल्याचे त्यांना बातम्यांमधून कळत होते. आझाद विचारे यांनी या वादळाचे लोकेशन आणि त्याचा मार्ग मोबाइलवर शोधून दिल्ली- गुजरात- मुंबई हा परतीचा मार्ग स्वीकारल्यास वादळ भेटणार, हे गृहीत धरून मार्गच बदलला आणि वाराणसीमार्गे पुन्हा प्रवास सुरू झाला. तिथून नागपूर- नांदेड- लातूर- सोलापूरमार्गे १७ जून रोजी ते हातखंबा येथे पोहोचले.या दुचाकीवरून होणाऱ्या प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र, त्यांनी ते आव्हान झेलत ही ६,२१२ किलोमीटरची यात्रा दुचाकीवरून यशस्वी केली.  यापूर्वीही आझाद विचारे यांनी लेह- लडाख, कन्याकुमारी, गुजरात आदी ठिकाणी बाइक ट्रीप केली आहे. भविष्यात गुजरातमधील गिरनार, सोमनाथ आणि ओडिसामधील जगन्नाथ पुरीपर्यंत बाइक ट्रीप करण्याचा त्यांचा मानस आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी