राजेश कांबळे : अडरेचिपळूण तालुक्यात १६ जूनपासून शाळा सुरु झाल्या. या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत १५ शाळांमध्ये ५२० विद्यार्थ्यांची कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. या तपासणीत विविध आजाराने बाधित १५५ विद्यार्थी आढळले. दोघांना संदर्भ सेवा देण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत १५ शाळांमध्ये ५२० विद्यार्थ्यांना विविध आजार आढळले. १२ जणांना कातडीचे आजार, १६ जणांना दाताचे, जंतदोष २३ विद्यार्थ्यात आढळून आला. इतर आजाराचे १०४ विद्यार्थी आढळले. यातील दोघांना संदर्भ सेवेसाठी पाठविण्यात येणार आहे. मुलांचे आरोग्य चांगले असावे, त्यांना कोणतेही आजार होऊ नयेत, साथीची बाधा होऊ नये, यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून ही तपासणी होते. मुले निरोगी असल्यास त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावतो. मनस्वास्थ्य चांगले राहाते, त्यांची प्रगती होते. त्यामुळे या तपासणीला अधिक महत्त्व आहे. या योजनेत तपासलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल प्रथम पंचायत समिती आरोग्य विभाग, नंतर जिल्हा परिषद व पुढे शिक्षण विभागाला पाठविला जातो. यात दोषी असलेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार व गंभीर आजार असलेल्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी ही तपासणी महत्वाची असल्याचे सांगण्यात आले.
शालेय आरोग्य तपासणीत १५५ मुले बाधित
By admin | Updated: July 4, 2014 23:45 IST