रत्नागिरी : जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीत येत्या २३ रोजी सार्वत्रिक व एका ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी तीन तालुक्यांतील १२ ग्रामपंचायतींसाठी एकूण १५० अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४ अर्ज आज छाननीवेळी अवैध ठरले आहेत.जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, विभाजनामुळे व नव्याने अस्तित्त्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दापोली, खेड आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांतील एकूण १२ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. दापोली तालुक्यातील कात्रण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आलेल्या एकूण १० अर्जांपैकी ४ अर्ज छाननीवेळी अवैध ठरले. ११ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, २३ रोजी मतदान होणार असून लगेचच निकाल जाहीर होईल. (प्रतिनिधी)तालुका ग्रामपंचायत एकूण अवैध अर्ज अर्जदापोलीकात्रण१००४पोफळवणे१३-शिवाजीनगर०४-साखळोली०९-खेडसुकिवली३०बहिरवली०९-चौघुलेमोहल्ला०५-शिर्शी१९-रजवेल०६-संगमेश्वरहातीव२३-डावखोल०५-कोंड्ये०७-
बारा ग्रामपंचायतींसाठी १५० अर्ज दाखल; ४ अवैध
By admin | Updated: December 9, 2014 23:22 IST