शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

महावितरणचे १५ कोटी थकीत

By admin | Updated: June 30, 2016 23:11 IST

कोकण परिमंडल : महावितरणच्या १ लाख १२ हजार ग्राहकांचा समावेश

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलातील १ लाख १२ हजार ५११ ग्राहकांकडे १५ कोटी ५० लाख ३८ हजारांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजार रुपयांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांची थकबाकी आहे.वर्षानुवर्षे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या कोकण परिमंडलातील २८ हजार ५५३ ग्राहकांकडे ९ कोटी ६ लाखांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने पावले उचलली आहेत. कायमस्वरूपी बंद तरीही घरातील अन्य सदस्यांच्या नावे मीटर घेण्यात आलेल्या ग्राहकांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.कोकण परिमंडलातील ८४ हजार ७० घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ८४ लाख ७४ हजार, वाणिज्यिक १२ हजार ७३० ग्राहकांकडे २ कोटी ९५ लाख ८३ हजार, औद्योगिक २ हजार १२७ ग्राहकांकडे १ कोटी ४९ लाख १४ हजार, कृषिपंपाच्या ९ हजार १०४ ग्राहकांकडे ६८ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाधारक १४८७ ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख ४१ हजार, १६०० पथदिव्यांची २ कोटी १३ लाख ३० हजार आणि अन्य १३९३ ग्राहकांकडे २६ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागातील १६ हजार ८५६ ग्राहकांकडे २ कोटी १५ लाख ७२ हजार, खेड विभागातील १८ हजार २१० ग्राहकांकडे २ कोटी ६३ लाख २२ हजार, रत्नागिरी विभागातील ३० हजार २६२ ग्राहकांकडे ३ कोटी ४३ लाख १३ हजारांची थकबाकी असून, जिल्हाभरातील एकूण ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागातील २५ हजार २५३ ग्राहकांकडे ३ कोटी ७७ लाख ५० हजार, कणकवली विभागातील २१ हजार ९३० ग्राहकांकडे ३ कोटी ५० लाख ८१ हजारांची थकबाकी असून, एकूण ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३१ हजारांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)वसुलीची कार्यवाही : घरगुती वीज ग्राहकांची संख्या अधिकमहावितरण कंपनीने थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले आहे. वसुलीसाठी पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे. थकबाकीची रक्कम भरून होणारी कारवाई टाळावी. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे.- कांचन आजनाळकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.