शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

१४,७४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By admin | Updated: February 11, 2016 23:46 IST

आम आदमी : महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा पाचव्या क्रमांकावर

शोभना कांबळे -- रत्नागिरी --आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील १४,७४२ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. अवघ्या चार महिन्यात एवढ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे.ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा, या हेतूने शासनाने कर्त्या व्यक्तिला विम्याचे संरक्षण देण्यासाठी ‘आम आदमी विमा योजना’ २ आॅक्टोबर २००७ पासून अस्तित्त्वात आणली आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला ही योजना लागू करता येते. साधारणत: २०१३ सालापासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्याचे अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रुपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रुपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रुपये अर्थसहाय शासनाकडून करण्यात येते.तसेच अशा लाभार्थीच्या ९ ते १२वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही ३०० रुपये इतकी शैक्षणिक मदतीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी १ लाख ६३ हजार २०० हतकी असून १,२१,४९३ इतकी पुरूषांची, तर ४७,७०७ इतकी महिलांची संख्या आहे. आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचे अर्जही आॅनलाईन भरण्यात आले होते. त्यामुळे अनेक समस्यांना शाळांना सामोरे जावे लागले होते. तरीही यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४,७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही शिष्यवृत्ती जमा झाली आहे. या योजनेचा लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.अवघ्या चार महिन्यात मिळाला लाभकर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास शासनाकडून मिळतो आम आदमी विमा योजनेचा लाभ.२ आॅक्टोबर २००७पासून योजना अंमलात.भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला योजना लागू करता येते.यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४ हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा.