शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पोक्सोअंतर्गत १० वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:35 IST

Court Ratnagiri-ल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन विविध ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने १० वर्षे सक्‍तमजुरी व ३७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लांजा तालुक्यातील शिपोशी येथे ही घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती.

ठळक मुद्देपोक्सोअंतर्गत १० वर्षांची सक्तमजुरीसरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन विविध ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने १० वर्षे सक्‍तमजुरी व ३७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लांजा तालुक्यातील शिपोशी येथे ही घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती.समीर शशिकांत जाधव (२१, रा. शिपोशी, लांजा, रत्नागिरी) याच्या विरोधात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी पीडित अल्पवयीन मुलगी कॉलेजहून घरी येत असताना संशयिताने तिचे अपहरण केले होते.याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात फूस लाऊन पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. समीर जाधव याची लांजा पोलिसांनी कसून चौकशी केली. २०१७ रोजी एका लग्नात पीडित मुलगी व समीर जाधव यांची ओळख झाली होती.

त्यानंतर प्रेमसंबंध जुळून आले होते. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून १६ जून २०१८ रोजी तिच्या कॉलेजमध्ये जाऊन तेथून तिला त्याच्या गावी शिपोशी येथे घेऊन गेला. या मुलीला विविध ठिकाणी नेऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते.पोलीस तपासादरम्यान झालेल्या वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गरोदर असल्याचे पुढे आले. त्यानंतर तिच्या वडिलांनी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दिली.पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी समीर जाधव याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास लांजा पोलीस स्थानकाच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव करत होत्या.

तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याचा निकाल पोक्सो विशेष न्यायालयाने जाहीर केला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्‍ता अ‍ॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयRatnagiriरत्नागिरी